Maharashtra Election: धक्कादायक ट्विस्ट! शिवसेनेनंतर राज ठाकरेंच्या मनसेची थेट अजितदादांच्या राष्ट्रवादीशी युती; केला 'हा' मोठा दावा

Jalna Municipal Corporation : गेल्या दीड-दोन महिन्यापासून जालन्या युतीसाठी शिवसेनेकडून प्रयत्न केले जात होते. नुसतं पत्र देऊन युती होत नसते, असं म्हणत भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर टीका केली होती. कालपर्यंत दोन्ही बाजूचे नेते हे आम्ही युतीसाठी सकारात्मक आहोत, आमचा फाॅर्म्युला ठरला आहे असा दावा करत होते.
Ajit Pawar Raj thackeray
Ajit Pawar Raj thackeraysarkarnama
Published on
Updated on

Jalna News: राज्यात महापालिका निवडणुकांच्या धर्तीवर दिवसेंदिवस राजकीय हालचाली मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.जागावाटपाची चर्चा फिस्कटल्यानंतर आगामी महापालिकेसाठी होत असलेल्या निवडणुकांसाठी युत्या-आघाड्या तुटल्या आहेत. राज्यात तब्बल 14 ठिकाणी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील युती तुटली आहे. त्यामुळे या सर्व 14 महानगरपालिकांत नेमकं काय काय होणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं हे.अशातच आता जालन्यातून (Jalna) मोठी अपडेट समोर येत आहे.

जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक नवा पॅटर्न समोर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महापालिका निवडणुकीसाठी भाजप शिवसेना युतीची घोषणा केली होती. त्यानतर अजित पवारांनी पुणे,पिंपरी चिंचवडसह यांसह अनेक महापालिका निवडणुकीत बेरजेचं राजकारण करतानाच शरद पवारांची राष्ट्रवादी वा इतर मित्रपक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला होता.यानंतर अजित पवारांनी आता राष्ट्रवादीनं थे्ट राज ठाकरेंच्या मनसेसोबतच युती केली आहे.

जालना नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसनं थेट राज ठाकरेंच्या मनसेशी युती करत मोठा धक्का दिला आहे. या दोन्ही पक्षांमध्ये जालना निवडणुकीसाठी मनसोसोबत जागावाटपाबाबत बोलणी फायनल करत तत्काळ शिक्कामोर्तब केलं आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि मनसेच्या जिल्हाध्यक्षांनी सोमवारी (ता.30) या युतीची घोषणा केली आहे.

जालना महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस 50 तर मनसेचे 6 उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. तर दुसरीकडे जालन्यात महायुतीतील भाजप आणि शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवत आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेलं आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असताना झालेली ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेची (MNS) युती चर्चेचा विषय ठरली.

Ajit Pawar Raj thackeray
Mahapalika Election News: धक्कादायक! भाजपनं मुलीला तिकीट नाकारताच आईला आला हार्ट अटॅक; मिरा-भाईंदरमध्ये राजकारण पेटलं

सर्वच राजकीय पक्षांकडून महापालिका निवडणुकीत अनेकांना तिकीट मिळाले तर काही पदाधिकाऱ्यांना ऐनवेळी उमेदवारीची संधी नाकारण्यात आली.त्यामुळे इच्छुकांची मेोठी नाराजी दिसून आली.ठिकठिकाणी स्थानिक पातळीवरील स्थिती लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांची शिवसेना तसंच भाजपामध्ये युती झाली आहे. तर, काही ठिकाणी या दोन्ही पक्षांनी युती तोडत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी महायुतीतील भाजप -शिवसेना हे दोन्ही पक्ष आम्हाला नगण्य समजत होते. जिल्हाध्यक्ष चव्हाण म्हणाले, हे दोन्ही पक्ष आम्हांला सोबत घ्यायला तयार नव्हते. पण आता मनसेसोबतच्या युतीनंतर जालना महानगरपालिकेचा पहिला महापौर राष्ट्रवादीचाच होईल असा दावाही चव्हाण यांनी केला आहे.

Ajit Pawar Raj thackeray
Shiv Sena News : आमदाराने शिवसेनेला घातले खड्ड्यात, भाजपच्या इशाऱ्यावर नाचतात! शिवसैनिकांचे बंडाचे निशाण...

जालन्यात महायुतीमध्ये सर्वच पक्ष स्वतंत्र लढत आहेत. भाजप 65 पैकी 64 जागावर निवडणूक लढत असून RPI (A)1 जागा लढवणार आहे. शिंदेंची शिवसेना ही सर्व 65 जागा लढवणार आहे. तर अजित पवारांची राष्ट्रवादी वंचित आणि मनसे एकत्रित निवडणूक लढणार आहे.

महायुतीमध्ये जागावाटपावून चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली. काही ठिकाणी भाजपाने कमी जागा मिळतायत म्हणून ताणून धरले. तर, काही ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने युती करण्यास नकार दिला. त्याचाच परिणाम म्हणून एकूण 14 ठिकाणी शिंदे आणि भाजपामधील महायुती तुटली आहे.

Ajit Pawar Raj thackeray
BMC elections 2025 : मुंबई महापालिकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला; मुस्लिमबहुल भागातील 18 वॉर्ड ठरणार कळीचा मुद्दा

या दोन्ही पक्षांमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नांदेड, अमरावती, मालेगाव, अकोला, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, धुळे, उल्हासनगर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना या महानगरपालिकांच्या निवडणुकीत युती नसेल. या सर्वच ठिकाणी दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत.

गेल्या दीड-दोन महिन्यापासून जालन्या युतीसाठी शिवसेनेकडून प्रयत्न केले जात होते. नुसतं पत्र देऊन युती होत नसते, असं म्हणत भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर टीका केली होती. कालपर्यंत दोन्ही बाजूचे नेते हे आम्ही युतीसाठी सकारात्मक आहोत, आमचा फाॅर्म्युला ठरला आहे असा दावा करत होते.

मनसेच्या राज ठाकरेंनी मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी युती केली आहे.या युतीमुळे भाजप-शिवसेनेसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. मुंबई महापालिका निवडणूक जिंकायचीच असा पणही ठाकरे बंधूंनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com