Pratap Patil Chikhalikar
Pratap Patil ChikhalikarSarkarnama

Nanded Loksabha Constituency : नांदेडमधून चिखलीकरांच्या उमेदवारीची मित्र पक्षांनाच झाली घाई

Lok Sabha Election 2024 : नांदेड लोकसभेची जागा भारतीय जनता पक्षाला सुटणार हे जवळपास निश्चित
Published on

Nanded News: नांदेड लोकसभेची जागा भारतीय जनता पक्षाला सुटणार हे जवळपास निश्चित आहे. विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाईल, हेही स्पष्ट असल्याचे बोलले जाते. चिखलीकरांनी ज्या पद्धतीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, ती पाहता तेच उमेदवार असतील, असा दावाही त्यांनी केला आहे.

दोन दिवसापूर्वी त्यांनी माळेगांव (जिल्हा नांदेड) येथील जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणाऱ्या खंडोबाचे दर्शन घेऊन विजयासाठी साकडेही घातले होते. त्यातच रविवारी पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे (अजित पवार गट) यांनी नांदेड लोकसभेसाठी खासदार चिखलीकर हे उमेदवार असतील,असे जाहीर करून टाकले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pratap Patil Chikhalikar
Ashok Chavan : संक्रांतीच्या दिवशी अशोक चव्हाण राजकीय नेत्यांना काय म्हणाले?

चिखलीकर यांच्या उमेदवारी संदर्भात भारतीय जनता पक्षाने अधिकृत कोणतीही घोषणा अद्याप केलेली नाही. तरीही महायुतीतील मित्र पक्षांना चिखलीकरांच्या उमेदवारीची अधिक घाई झाल्याची चर्चा काळे यांच्या दाव्यानंतर जिल्ह्यात होऊ लागली आहे. परिणामी भारतीय जनता पक्षातील लोकसभा लढवण्यास इच्छुक असलेल्या इतर नेत्यांची मात्र गोची होतांना दिसत आहे.

लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे रविवारी राज्यभर समन्वय समितीचे मेळावे पार पडले. या मेळाव्यात महायुतीच्या घटक पक्षाचे नेते, मंत्री उपस्थित राहिले. काही ठिकाणी रुसवे फुगवे, मानापमान नाट्यही रंगले. तर काही मेळाव्यात थेट उमेदवार कोण असेल असे संकेतही अनेक नेत्यांनी आपल्या भाषणातून दिले.

नांदेड लोकसभा मतदारसंघातून गेल्या निवडणुकीतील विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. विद्यमान खासदार चिखलीकरांनी मीच उमेदवार आणि गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्याने निवडूण येणार, असा दावा करायला सुरुवात केली आहे. महायुतीच्या मेळाव्यात संभाव्य उमेदवाराच्या महाविजयाचा संकल्पही यावेळी करण्यात आला.

याच मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे (अजित पवार गट) यांनीही भाषण केले. लोकसभेत महायुतीची सत्ता येणार असून घटक पक्षातील पदाधिकार्यांनी समन्वय ठेवून काम करावे. ‌खासदार चिखलीकर‌ हेच उमेदवार असतील, असेही काळे यांनी सांगून टाकले.

या समन्वय मेळाव्यात खासदार हेमंत पाटील, प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, राजेश पवार, डॉ. तुषार राठोड, उमेश पाटील यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीच्या घटक पक्षांचे नेते, पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Edited By- Ganesh Thombare)

Pratap Patil Chikhalikar
DCM Ajit Pawar: अजितदादा...तुम्हीसुद्धा...! आधी 'चहापाना'च्या खर्चावरून मुख्यमंत्री शिंदेंना घेरले, आता दीड कोटी मंजूर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com