

Nanded crime news : नांदेड शहर गँगवाॅरने हादरलं आहे. या गँगवाॅरमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्रीपासून नांदेड शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
या गँगवाॅरप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून, पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. पोलिसांनी खबरदारी म्हणून, शहरातील बंदोबस्त वाढ केली आहे.
अर्जितसिंह चव्हाण, सय्यद आवेज आणि मोहम्मद अरबाज या तिघांचा मृ्त्यू झाला आहे. विशेष म्हणजे, मयत अर्जितसिंह चव्हाण हा महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मधून शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचा उमेदवार होता. अर्जितसिंह चव्हाण हा रेकाॅर्डवरचा गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात नऊ गुन्हे दाखल आहेत. एमपीडीए अंतर्गतही गुन्हा दाखल आहे.
अर्जितसिंह चव्हाण आणि साई लाला, या गँगमध्ये नांदेड (Nanded) शहरात पूर्वीपासून वाद सुरू आहे. हा वाद काल मध्यरात्री उफळला. अर्जितसिंह चव्हाण हा त्याचे दोन साथीदार हे 'धुरंधर' चित्रपट पाहून येत होते. त्याचवेळी साई लाला गँगचे हल्ला करण्याच्या तयारी दबा धरून बसले होते.
अर्जितसिंह चव्हाण व त्याचा साथीदार काही अंतर गेल्याबरोबर साई लाला गँगने हल्ला चढवला. तलवार, चाकू दोन्ही गँगमध्ये तुबंळ हाणामारी झाली. अर्जितसिंह चव्हाण आणि सय्यद आवेज, या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या हाणामारीत मोहम्मद अरबाज गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पुढे त्याचाही मृत्यू झाला.
अर्जितसिंह चव्हाण आणि सय्यद आवेज या दोघांही रुग्णालयात आणण्यात आले होते. तिथं मोठी गर्दी झाली होती. अर्जितसिंह चव्हाण याचा भाऊ आणि वडील रुग्णालयात होते. तणावाची परिस्थिती होती. मयत अर्जितसिंह चव्हाण आणि आवेज अन् अरबाज, या दोघांच्या कुटुबांच्या परस्परविरोधात तक्रारीवरून गुन्हे दाखल केले आहेत.
नांदेड पोलिसांनी या गँगवाॅरमध्ये चौघांना अटक केली आहे. या दोन्ही टोळ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी मोठी आहे. या एका टोळीतील अनिल पंजाबी हा सध्या जेलमध्ये आहे. यामधील साहिल देखील दोन महिन्यापूर्वी जेलमधून बाहेर आला होता. टोळीतील काहींवर आधीही कडक कारवाई झालेली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.