Nanded Politics : एकनाथ शिंदेंच्या निकटवर्तीय नगरसेविका अन् पतीला दणका! नांदेड महापालिकेने 'या' कारणामुळे बजावली थेट नोटीस!

Nanded Politics News : अनधिकृत बांधकामाचा आरोप करत या दाम्पत्याला 28 सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत.
Nanded Municipal Corporation
Nanded Municipal Corporationsarkarnama
Published on: 
Updated on: 

Nanded News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नांदेडमधील निकटवर्तीय नगरसेविका आणि त्यांच्या पतीला अनधिकृत व मंजूर नकाशाविरुद्ध बांधकाम करणे चांगलेच भोवले आहे. त्यामुळे नांदेड-वाघाळा महापालिकेने नोटीस बजावली आहे. विमानतळ प्राधिकरणाच्या संचालकांनी पाठवलेल्या पत्रानंतर महापालिकेने ही नोटीस बजावली आहे. अनधिकृत बांधकामाचा आरोप करत या दाम्पत्याला 28 सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत.

नांदेड-वाघाळा महापालिकेच्या अपक्ष नगरसेविका मीनल पाटील आणि त्यांचे पती गजानन पाटील यांना अनधिकृत व मंजूर नकाशाविरुद्ध बांधकाम केले आहे. नगरसेविका मीनल पाटील आणि त्यांचे पती गजानन पाटील हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. निवडणूक जिंकल्यानंतर पाटील दाम्पत्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. या अनधिकृत बांधकाम प्रकरणी नोटीस बजावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

सांगवी येथील श्री गुरु गोबिंदसिंघ जी विमानतळाच्या रनवे क्षेत्रात ​नगरसेविका मीनल पाटील आणि गजानन पाटील यांचा एक भूखंड आहे. या भूखंडावर चार मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम महापालिकेच्या मंजूर नकाशाविरुद्ध करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर, 1 जून रोजी तरोडा-सांगवी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी नगरसेविका मीनल पाटील यांना नोटीस बजावली होती.

Nanded Municipal Corporation
Maharashtra Political Update : देश-विदेशात दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

नोटीस मिळाल्यापासून एका महिन्याच्या आत इमारतीचे अनधिकृत बांधकाम पाडून टाकावे, अनधिकृत वापर थांबवावा आणि बांधकाम त्वरित बंद करावे, असे निर्देश देण्यात आले होते. तरीदेखील नगरसेविका पाटील यांनी बांधकाम सुरूच ठेवले होते. दरम्यान, महापालिकेने केलेल्या पाहणीत अनधिकृत बांधकाम झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Nanded Municipal Corporation
Maharashtra Political Live Update: सीबीआयची रायगड जिल्ह्यात मोठी कारवाई; केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागात खळबळ

त्यानंतर आता नांदेड-वाघाळा महापालिकेने आता नगरसेविका मीनल पाटील आणि त्यांचे पती गजानन पाटील यांना नोटीस बजावली आहे. त्यांना 28 सप्टेंबर रोजी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता काय कारवाई केली जाणार याची उत्सुकता लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com