Parbhani NCP Politics : राष्ट्रवादीच्या गटनेत्यानेच धाडली नगरसवेकाला अपात्रतेची नोटीस! परभणीत पक्षातील अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर

ncp corporator disqualification notice : नुकताच महापालिकेच्या निवडणूका झाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षातील अंतर्गत धुसफुस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.
Parbhani NCP Politics
Parbhani NCP Politicssarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अक्षय देशमुख यांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे.

  2. ही कारवाई विजय जामकर यांच्या तक्रारीनंतर करण्यात आली आहे.

  3. या प्रकरणाची सुनावणी 20 एप्रिल रोजी होणार असून पक्षातील वाद उघड झाला आहे.

Marathwada Politics News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अक्षय देशमुख यांच्याविरुध्द गटनेते विजय जामकर यांनी केलेल्या तक्रारीवरून विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी अपात्रतेची नोटीस बजावली. त्यावर 20 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. यामुळे पक्षातील अंतर्गत धुसफुस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मनपातील गटनेते विजय जामकर यांनी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाकडे आपल्या विधिज्ज्ञामार्फत महाराष्ट्र स्थानिक सदस्य अनर्हता अभिनियम 1986 चे कलम 3 अन्वये अपील दाखल केले आहे. त्यावरून विभागीय आयुक्त पापळकर यांनी नगरसेवक अक्षय देशमुख यांना नोटीस पाठवली.

सोमवारी (ता.20) दुपारी दोन वाजता लेखी म्हणने व त्या पुष्ठ्यर्थ आवश्यक पुराव्यासह सुनावणीस उपस्थित राहण्याची सूचना यात करण्यात आली आहे. मनपात राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 सदस्य असून महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य पक्ष व यशवंत सेना या पक्षांत महायुती झाली होती. तर या निवडणूकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेसने आघाडी केल्यामुळे त्यांचे संख्याबळ पुरेसे होते.

Parbhani NCP Politics
NCP Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी, सुनेत्रा पवार-प्रफुल पटेलांमध्ये बैठक, पार्थ, जय पवारही उपस्थित!

परंतु अक्षय देशमुख यांनी पक्षाचा व्हीप डावलून महापौर पदाच्या निवडणूकीत आघाडीच्या उमेदवाराला मतदान केले. तर उपमहापौरपदाच्या निवडणूकीत महायुतीच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केल्याचा आरोप गटनेत्यांनी केला. पक्षातील शिस्त बिघडू नये म्हणून विभागीय आयुक्तांकडे आपले अपील दाखल केले होते. त्याची सुनावनी सोमवारी 20 रोजी होणार आहे.

Parbhani NCP Politics
NCP Politics : सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय, प्रफुल पटेलांना कार्याध्यक्ष पदावरून हटवलं? जय पवारांची राजकारणात एन्ट्री

FAQs :

1. अक्षय देशमुख यांना नोटीस का देण्यात आली?
विजय जामकर यांनी केलेल्या तक्रारीनंतर अपात्रतेची नोटीस देण्यात आली.

2. या प्रकरणाची सुनावणी कधी होणार आहे?
20 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

3. हा वाद कोणत्या पक्षात आहे?
हा वाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे.

4. या प्रकरणाचा परिणाम काय होऊ शकतो?
देशमुख यांच्या राजकीय कारकिर्दीवर परिणाम होऊ शकतो.

5. नोटीस कोणी बजावली?
विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी नोटीस बजावली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com