

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची संयुक्त सभा होत आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित आहेत. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.
अजित पवार म्हणाले, ''आम्ही नेहमी संविधानाच्या पुढे नतमस्तक होतो. पण देशात सध्या काय परिस्थिती सुरू आहे, हे सर्वांना माहित आहे. जर असंच घडत राहिलं तर देशात अस्थिरता निर्माण होईल. या सरकारचा पायगुण चांगला नाही. कारण उद्धव ठाकरे यांच्या काळात दीड लाख लोक कामाला लागतील असे उद्योग राज्यात येत होते. पण हे सरकार आलं आणि सगळे उद्योग परराज्यात गेले. यात दोष कुणाला द्यायचा?'', असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
''७५ हजार सरकारी नोकऱ्यांचे पदे भरणार म्हणाले पण कधी भरणार? हे काय सांगितलं नाही. तरुणांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार हे सरकार करत आहे'', असा आरोप यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला. ''सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून सांगता मग मराठवाडा मुक्ती संग्राम सभेला मुख्यमंत्र्यांनी फक्त १३ मिनीटं वेळ दिला. मग हा मराठवाड्याच्या जनतेचा आपमान नाही का?'', असंही अजित पवार म्हणाले.
''आज येथे सभा होत असताना राज्यातले तीन मंत्री गौरव यात्रा काढतात. यात्रा काढायला हरकत नाही. मात्र, तुम्ही दुटप्पी पणाचं राजकारण करत आहात. मध्ये सर्वोच्च न्यायालय म्हटलं की हे नपुंसक सरकार आहे. अरे या सरकारला काही जनाची नाही तर मनाचीही वाटत नाही का?'', असंही अजित पवार म्हणाले.
''छत्रपतींचे नाव घेऊन तुम्ही सत्तेत आलात. पण त्यांचा अपमान झाला तेव्हा तुम्हाला राज्यपालांना थांबवता आलं नाही. महाराष्ट्र हे कधीही विसरणार नाही. राज्यपालांनी अनेक महापुरुषांची बदनामी केली. त्यावेळी तुमची दातखीळ बसली होती का?'', असं म्हणत अजित पवार सरकारवर जोरदार टीका केली.
''तुमच्यात खरंच ताकद असेल तर सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा. महागाई आणि बेरोजगारीवरचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सध्या राजकारण सुरु आहे. शेतकऱ्यांचे, उद्योगजकांचे प्रश्न असतांना जाणीवपूर्वक वातावरण खराब करण्यात येत आहे'', असंही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.