Aimim News : ते घर मतीन पटेलचे नाही, एमआयएमच्या विरोधी पक्ष नेत्यांचा दावा; नोटीसीविरोधात कोर्टात धाव!

Nida Khan case News : महापालिकेने त्या घरावर नोटीस चिटकावत तीन दिवसात कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. याविरोधातही आपण कोर्टात धाव घेतल्याची माहिती दिली.
Nida Khan, Matin Patel
Nida Khan, Matin PatelSarkarnama
Published on
Updated on

Nida Khan Case News : निदा खानला आपल्या घरात आश्रय दिल्याचा आरोप असलेल्या एमआयएम नगरेसवक मतीन पटेल यांच्याविरोधात नाशिक पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर महापालिकेने मतीन पटेल याने ज्या नारेगावमधील घरात निदा खानला ठेवल्याचा आरोप आहे ते घरच त्याचे नसल्याचा दावा महापालिकेतील विरोधी पक्ष नेते समीर साजेद बिल्डर यांनी केला आहे. महापालिकेने त्या घरावर नोटीस चिटकावत तीन दिवसात कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. याविरोधातही आपण कोर्टात धाव घेतल्याची माहिती दिली.

टिसीएस कंपनीत एचआर विभागात अधिकारी असलेल्या निदा खान हिच्यावर जबरदस्तीने धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी तिच्यावर गुन्हाही दाखल आहे. फरार निदा खान छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव भागात एमआयएम (Aimim) नगरसेवकाच्या घरात कुटुंबासह राहत होती. नाशिक व छत्रपती संभाजीनगर पोलीसांनी संयुक्तपणे कारवाई करत तिला अटक केली होती.

Nida Khan, Matin Patel
Imtiaz Jaleel On Sanjay Shirsat : 'संजय शिरसाटांना मी कवडीचीही किंमत देत नाही!': निदा खान प्रकरणात पोलीसांना सहकार्य करेल! इम्तियाज जलील यांची भूमिका

निदा खान ही कुटुंबासह ज्या घरात राहत होती, ते घर एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांचे असल्याचा दावा केला जात आहे. शिवाय या घराचे काम अनाधिकृत असल्याचे सांगत महापालिकेने या घरावर नोटीस लावून तीन दिवसात कागदपत्रे सादर करण्याची डेडालाईन दिली आहे. महानगर पालिका कायद्यातील तरतुदीनूसार घराचे बांधकाम अवैध असले आणि जर त्याची नोंद मतीन पटेल यांच्या निवडणूक शपथ पत्रात नसेल तर त्यांचे नगरसेवक पदही रद्द होऊ शकते, असे महापौर समीर राजूरकर यांनी स्पष्ट केले.

Nida Khan, Matin Patel
Nashik TCS Case : TCS धर्मांतर प्रकरणात पहिलं राजकीय कनेक्शन उघड ; निदा खानला आश्रय देणारा MIM नगरसेवक पोलिसांच्या रडारवर

महापौरांच्या या दाव्यानंतर विरोधी पक्ष नेते समीर साजेद बिल्डर हे मैदानात उतरले आहेत. मतीन पटेल यांनी निदा खान हिला लपवून ठेवले होते, मुळात हा आरोपच चुकीचा असल्याचा दावा केला. तसेच निदा खान हिला ज्या घरातून अटक करण्यात आली ते मतीन पटेल याचे होते हा माध्यमांनी आणि महापौरांनी केलेला दावा देखील फेटाळला. हे घर मतीन पटेल यांचे नाहीच, असा दावा समीर साजेद यांनी केला.

Nida Khan, Matin Patel
Bulldozer Action : महापालिकेचा एमआयएमला झटका! मतीन पटेलचे नगरसेवक पद जाणार? बुलडोझरही चालणार; महापौरांच्या इशाऱ्याने खळबळ

कुठल्याही अतिक्रमित घरावर कारवाई करायची असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानूसार संबंधितांना पंधरा दिवस आधी नोटीस द्यावी लागते. महापालिकेने इथे तीन दिवसांची नोटीस दिली, ती अन्यायकारक आहे, याविरोधात आम्ही कोर्टात गेलो आहोत. राहिला प्रश्न मतीन पटेल यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा तर त्यांना नगरसेवक महापौर किंवा मिडियाने केलेले नाही. त्या प्रभागातील जनतेने त्यांना निवडून दिले आहे. त्यामुळे ते नगरसवेक पदावर राहतील की नाही? हे ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाही, असा संतापही समीर साजेद यांनी व्यक्त केला.

Nida Khan, Matin Patel
Maharashtra News Live Update: राज्य सरकारचा 'आयएलएस' महाविद्यालयाला दणका, विद्यार्थ्यांकडून घेतलेले शुल्क व्याजासह परत करण्याचे निर्देश

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com