OBC Melava : भुजबळसाहेब, आम्ही तुमच्याबरोबर युती करू, पण त्यांच्याशी नाही; जानकरांचा इशारा कोणाला?

Mahadev Jankar News : गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ यांनी पक्ष काढला असता तर महादेव जानकर आज या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून आला असता.
Mahadev Jankar-chhagan Bhujbal
Mahadev Jankar-chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Hingoli News : भुजबळसाहेब, छोटा का होईना आम्ही आमचा पक्ष काढला. पण, तुमच्याबरोबर युती करायला तयार आहे. तुम्हीही पक्ष काढा, तुम्ही म्हणाल ती जागा सोडण्याची आमची तयारी आहे. आम्ही तुमच्याबरोबर युती करू, पण त्यांच्याबरोबर युती करणार नाही. आम्ही तुम्हाला पैसादेखील कमी पडू देणार नाही, असे सांगून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी छगन भुजबळ यांना ओबीसींचा पक्ष काढण्याचे आवाहन केले. (Bhujbalsaheb, withdraw party of OBCs, we will allince with you : Mahadev Jankar)

हिंगोलीत ओबीसींचा दुसरा महाएल्गार मेळावा झाला. त्या मेळाव्यात जानकर यांनी विविध विषयाला स्पर्श करत ओबीसींना सत्ताधारी होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ यांनी पक्ष काढला असता तर महादेव जानकर आज या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून आला असता. पण, आमच्या काही चुका झाल्या आहेत. कोणाला शिव्या देण्यात वेळ घालवू नका. तुम्ही सत्ताधारी बना. शंभरात ८५ जर ओबीसी असतील तर छोट्या लोकांना मागायला कशाला जायचे. मला तिकिट द्या अन्‌ मला आमदार करा न मला खासदार करा म्हणून.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mahadev Jankar-chhagan Bhujbal
Pune News : पवारांचा मोठा निर्णय; ‘कार्यक्रमाला येईल, पण भाषण करणार नाही’

ओबीसी बांधवांनी कुठल्याही धर्मावर, जातीवर टीका करण्यापेक्षा मी पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष होणार नाही. झालो तर आमदार आणि खासदाराच होईन, असे ठरावावे. माझ्या राष्ट्रीय समाज पक्षाला चार राज्यांत मान्यता मिळाली होती. आज सहा आमदारांना आणि ९२ जिल्हा परिषद सदस्यांना माझ्या पक्षाने जन्म दिला आहे, असेही जानकर यांनी स्पष्ट केले.

उत्तर प्रदेशमध्ये मुलायम सिंह यांनी पक्ष काढल्यामुळे त्यांचा मुलगा अखिलेश मुख्यमंत्री झाले. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये ओबीसींना न्याय मिळतो. कांशीराम यांनी बहुजन समाज पार्टी काढल्यामुळे मायावती मुख्यमंत्री झाल्या. आज महाराष्ट्र कोण चालवतंय. कुणाच्या मागं फिरून तिकिट मागतोय. कुणाला मंत्रिपद मागतोय. म्हणून म्हणतो डिमांडर नव्हे, तर कमांडर बना. काय होईल ते होईल. मंत्री होऊ अथवा न होऊ. आम्हाला जर तुम्ही चॅलेंज देणार असाल, आम्हीही तुम्हाला चॅलेंज देऊ शकतो. मिळंमिळं धोरण नको आहे. ज्याला यायचं आहे, तो आमच्या बरोबर येईल. ज्याला विरोध करायचा आहे, त्याला आम्हीही तयार आहोत, असे आव्हान जानकर यांनी दिले.

Mahadev Jankar-chhagan Bhujbal
Jarange Patil On Fadnavis : फडणवीसांचा एकदाच फोन आला अन्‌ एकच वाक्य बोलले... मनोज जरांगेंनी सांगितली 'ती' गोष्ट

ते म्हणाले की, आम्ही होळकरांची औलाद आहोत. आम्हाला जो नडला, त्याला आम्ही नडू. आम्हाला सर्वजण पाहिजेत. आम्ही कोणाला नाकारत नाही. त्यामुळे आगामी काळात दलित आणि मुस्लिम समाजाला सोबत घेतलं पाहिजे. तुमची सत्ता नसल्यामुळे तुम्हाला भिकाऱ्यासारखं मागावं लागतं.

आता आपल्याला बुद्धीने राजकारण करावं लागेल. समतावादी भूमी आपल्याला तयार करावी लागली. छगन भुजबळ आणि गोपीनाथ मुंडे एकत्र आले असते तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती. पण दुर्दैवाने ती आमच्यावर आली, त्यामुळे मताच्या दृष्टीने ओबीसींनी एकत्र यावे, असे आवाहन करतो, असेही जानकर म्हणाले.

Mahadev Jankar-chhagan Bhujbal
Solapur News : सगळंच बारामतीला नेण्याची प्रथा सुरू केली काय? अन्न उत्कृष्टता केंद्रावरून सुभाष देशमुख आक्रमक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com