Parbhani Politics : परभणीत महापौर कोणाचा? चंद्रपूरमधील गेमनंतर वाढली ठाकरेंची धडधड : काँग्रेस वचपा काढणार की साथ देणार? ऐनवेळी भाजप येणार मदतीला?

Parbhani Municipal Corporation News : परभणीत कोण होणार महापौर? भाजप संधीच्या शोधात, तर उद्धव ठाकरेंच्या पक्षापुढे आघाडी टिकवण्याचे आव्हान!
Parbhani Municipal Corporation building
Parbhani Municipal Corporation building Sarkarnama
Published on
Updated on

शिवाजी वाघमारे

Prabhani News : परभणी महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस आघाडीने बहुमतासह सत्ता मिळवली. महापौर-उपमहापौर पदाच्या निवडीसाठी उद्या (ता.12) महापालिकेची विशेष सभा होत आहे. दोन दिवसापर्यंत सगळं काही सुरळीत असताना चंद्रपूरमधील प्रकारामुळे परभणीत काय होणार? याची उत्सूकता संपूर्ण राज्याला लागली आहे.

ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये बिघाडी होऊन आपला खेळ जमतो का? यासाठी भाजप संधी शोधत आहे. तर चंद्रपूरचा इफेक्ट परभणीत होऊ नये यासाठी खासदार संजय जाधव प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर, उपमहापौर कोण होणार? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. चंद्रपूर प्रमाणे परभणीत ठाकरेंची शिवसेना आणि भाजप एकत्र येणार का? अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत.

दुसरीकडे भाजप (BJP) ऑपरेशन लोटसच्या तयारीत असून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत जाणार की विरोधात बसणार? ठाकरेसेनेला दगाफटका झाल्यास ते कुणाला सोबत घेणार? अशा सगळ्याच चर्चांभोवती सध्या परभणीतील राजकारण फिरते आहे. महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक गुरुवारी सकाळी 11 वाजता बी. रघुनाथ सभागृहात पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

Parbhani Municipal Corporation building
Pune BJP : पुण्याच्या राजकारणातील मोठी घडामोड, भाजपचा बंडखोरांना हिसका; 69 जणांचे निलंबन, संपूर्ण यादीच वाचा!

महानगरपालिका निवडणूक आघाडी करून लढवलेल्या ठाकरेसेना व काँग्रेस (Congress) आघाडीला बहुमत प्राप्त झाले आहे. ठाकरेसेनेचे 25 तर काँग्रेसचे 12 सदस्य निवडून आले असून ही निवडणूक पूर्व आघाडी एकसंध राहिल्यास ठाकरे सेनेचा महापौर व काँग्रेसचा उपमहापौर होणार हे निश्चित समजले जात आहे. परंतु चंद्रपूर येथे ठाकरे सेनेने काँग्रेसची साथ सोडून भाजपला पाठिंबा दिल्यामुळे राज्य पातळीवर ठाकरेसेनेविरुध्द नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. त्यामुळे ऐनवेळी काँग्रेसच्या नगरसेवकांना श्रेष्ठींचा काही वेगळा आदेश आला तर काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Parbhani Municipal Corporation building
Shivsena Politics : शिवसेनेत घराणेशाही! शिंदेंच्या आमदाराची पाची बोटं तूपात, पत्नी अन् सुनही ZPत

भाजप ऑपरेशन लोटसच्या तयारीत

महानगरपालिकेत भाजपाचे 12, राष्ट्रवादी काँग्रेसचे 11, जन सुराज्य शक्तीचे तीन, यशवंत सेनेचा एक व अपक्ष एक नगरसेवक निवडून आले आहेत. यांची गोळाबेरीज केली तरी ती 28 पर्यंत जाते. बहुमतासाठी भाजपला अजूनही सहा सदस्यांची गरज आहे. हे सहा सदस्य मिळवण्यासाठी भाजपने ऑपरेशन लोटस सुरू केल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस बरोबर पक्षाचे नेते चर्चा करीत आहेत. त्याच बरोबर ठाकरे सेना किंवा काँग्रेसमधील एखादा नाराज गट गळाला लागतो का? यासाठी भाजपची चाचपणी सुरू आहे.

Parbhani Municipal Corporation building
NCP Leaders Meet CM : एकीकडे रोहित पवारांचे धक्कादायक खुलासे; दुसरीकडे रुपाली पाटील, अमोल मिटकरी CM फडणवीस यांच्या भेटीला

तशा स्वरूपाच्या वाटाघाटी झाल्यास भाजपला महापौरपद तर राष्ट्रवादीला उपमहापौरपद मिळू शकते. परंतु जिल्हा परिषदेत सत्तास्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीला कदापीही सोबत घेणार नसल्याचे पालक मंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट आहे. त्यामुळे पालिकेत राष्ट्रवादी सोबत जाईल का? हा देखील प्रश्नच आहे.

Parbhani Municipal Corporation building
Pune Congress : ज्या जिल्हा परिषदेत 38 वर्ष सत्तेत तिथेच काँग्रेसचं पानिपत : एकही जागा जिंकता आली नाही!

ठाकरेसेना, काँग्रेसचा उमेदवार कधी निश्चित होणार

महापौर व उपमहापौर पदाच्या नावावरुन ठाकरेसेनेसह काँग्रेसमध्ये देखील गट-तट पडल्याचे चित्र आहे. ठाकरेसेनेत तब्बल सहा जणांनी दावा केला असला तरी त्यामध्ये तीन जण हे प्रबळ दावेदार समजले जातात. यापैकी दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणार असल्याची चर्चा देखील रंगू लागली आहे. परंतु महापौरपदाच्या नावावर मुंबईतच शिक्कामोर्तब होणार असून त्यासाठी सर्व नगरसेवक दोन दिवसापूर्वीच मुंबईला गेले आहेत. तर काँग्रेसमध्ये देखील उपमहापौर पदाच्या नावावरून दोन गट पडल्याचे बोलले जाते. त्यापैकी एक गट हैदराबादला गेलेला आहे. त्याचा फायदा भाजप उठवणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Parbhani Municipal Corporation building
Shivsena Vs Ncp : ‘जिंकूनही हरली’ शिवसेना! रायगडात गोगावलेंनी पत्ते उघडताच तटकरेंनी डाव साधला

निवडणूक होणार की बिनविरोध निवड

महानगरपालिकेच्या गुरुवारी होणाऱ्या विशेष सभेतच नाट्यमय घडामोडी होण्याची शक्यता आहे. या सभेत उबाठा व काँग्रेसने महापौर, उपमहापौरपदाचे उमेदवार दिल्यास भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस आपले उमेदवार उभे करतात की उमेदवारी मागे घेतात? हे दिसून येईल. किंवा एखादा पक्ष उमेदवारी मागे घेऊन तटस्थ राहतो, हे देखील स्पष्ट होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आपल्या उमेदवारी काढून घेण्याची शक्यता अधिक आहे.

Parbhani Municipal Corporation building
ShivSena UBT : धक्कादायक! जिल्हाप्रमुखांनी घेतली चक्क उद्धव ठाकरेंची जागा; मातोश्रीवर कळताच निघाले फर्मान

या आहेत शक्यता

उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष आणि काँग्रेस ही निवडणुकीत झालेली आघाडी कायम राहील. किंवा काँग्रेसने चंद्रपूरचा बदला घेण्याचे ठरवले तर मग ठाकरेंची शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे ऐनवेळी एकत्र येऊ शकतात. तिसरी शक्यता ही चंद्रपूर पॅटर्न परभणीत राबवून शिवसेना उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि भाजप मिळून महापौर-उपमहापौर पदासह महापालिकेत सत्ता स्थापन करू शकतात. आणखी एक शक्यता म्हणजे भाजप व राष्ट्रवादी व काँग्रेस हे तीन पक्ष सोबत येऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाच सत्तेबाहेर ठेवू शकतात.

Parbhani Municipal Corporation building
Congress Vs BJP : 'अशोक चव्हाण खुर्चीत, नगराध्यक्ष उभे...'; काँग्रेस प्रवक्त्याने 'चव्हाण', 'देशमुख' पॅटर्नमधील फरक सांगितला

हे आहेत महापौर पदाचे दावेदार..

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडून महापौर पदासाठी सय्यद शरफोद्दीन इफ्तेखारोद्दीन, सय्यद समी उर्फ माजुलाला, सय्यद एकबाल सय्यद खाजा हे प्रमुख दावेदार आहेत. तर काँग्रेसकडून उपमहापौर पदासाठी गणेश देशमुख, गुलमीरखान कलंदरखान यांच्या नावाची चर्चा आहे. संधी मिळाली तर भाजपकडून मिनाताई वरपुडकर, डॉ. केदार खटींग, भाजपाकडून उपमहापौरपदाचे दावेदार तिरुमला खिल्लारे, तर राष्ट्रवादीकडून अर्जुन सामाले, नाजेमा बेगम स. अ. रहीम हे अनुक्रमे महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार असू शकतील.

Parbhani Municipal Corporation building
Congress Vs BJP : 'अशोक चव्हाण खुर्चीत, नगराध्यक्ष उभे...'; काँग्रेस प्रवक्त्याने 'चव्हाण', 'देशमुख' पॅटर्नमधील फरक सांगितला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com