ShivSena UBT : धक्कादायक! जिल्हाप्रमुखांनी घेतली चक्क उद्धव ठाकरेंची जागा; मातोश्रीवर कळताच निघाले फर्मान

Kolhapur ShivSena Internal Conflict : कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुखांनी परस्पर पदाधिकारी निवड जाहीर केल्याने पक्षात गोंधळ उडाला असून, मातोश्रीच्या आदेशानंतर ही निवड प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.
Matoshree issues strict orders after an unauthorized appointment announcement by a Thackeray Shiv Sena district chief in Kolhapur, highlighting internal discipline and leadership authority.
Matoshree issues strict orders after an unauthorized appointment announcement by a Thackeray Shiv Sena district chief in Kolhapur, highlighting internal discipline and leadership authority.Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT : कोल्हापूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात धक्कादायक प्रकार घडला असून परस्पर एका जिल्हाप्रमुखांने पदाधिकारी निवड जाहीर केली होती. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाशिवाय कोणतीही पदाधिकारी निवड जाहीर होत नसल्याचे कळताच थेट पक्षाचे सचिव विनायक राऊत यांनी प्रसिद्धी पत्र जाहीर करत पदाधिकारी निवडीला स्थगिती देण्यात दिली आहे. संपूर्ण प्रकारानंतर जिल्हाप्रमुखांची मनमानी पुन्हा एकदा समोर आली आहे.

उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक असो वा पदाधिकारी तो नेहमीच मातोश्रीच्या खुर्चीला मान देतो. पक्षप्रमुखांचा आदेश मानून सर्वस्व पणाला लावून शिवसेनेसाठी राबतो. अत्यंत प्रामाणिक, पक्षनिष्ठ आणि केवळ आदेश मानणारा शिवसैनिक तोच केवळ ठाकरेंच्या गोठातील खरा शिवसैनिक आहे. कोणतीही निवडणूक असो त्यामध्ये जीत असो वा हार त्यामध्ये तो स्वतः झोकून काम करतो. शिस्तप्रिय असणारा शिवसैनिक केवळ मातोश्रीवरील पक्षप्रमुखांचा आदेशानुसार वागतो.

शिवसेनेतील प्रत्येक पदाधिकारी निवड ही पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानेच होते. तेही शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून. ते अधिकार केवळ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आहेत. पण कोल्हापुरातील जिल्हाप्रमुखाने शिवसेनेची शिस्त धाब्यावर बसवून चक्क पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जागा घेतली आहे. जिल्हाप्रमुखांना पदाधिकारी निवडीचा कोणताही अधिकार नसताना पदाधिकारी निवड करत त्या माध्यमातून प्रसिद्ध केल्या आहेत.

जिल्हाप्रमुखांच्या लेटर पॅड वरून या निवडी जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले व महिला जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या मान्यतेने जिल्हास्तरावरील नवीन पदाधिकारी निवडी बुधवारी जाहीर करण्यात आल्या असे स्पष्ट करण्यात आले होते.

शैलेश पुणेकर (जिल्हा समन्वयक कोल्हापूर, उत्तर, दक्षिण), सागर साळोखे (कोल्हापूर उत्तर समन्वयक), रघुनाथ टिपडे (कोल्हापूर दक्षिण समन्वयक), विवेक काटकर कोल्हापूर (दक्षिण ग्रामीण तालुका संघटक), अभिजीत पोरे (उपतालुकाप्रमुख पाचगाव), संतोष ओतारी (विभागप्रमुख पाचगाव,) अमृता जाधव (कोल्हापूर, महिला शहर संघटिका दक्षिण) अनिता ठोंबरे (उपजिल्हा संघटिका दक्षिण ग्रामीण), दीपाली शिंदे (महिला समन्वयक उत्तर) अशी निवड करण्यात आली होती.

दरम्यान या संदर्भातील वृत्त काही दैनिकांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर चांगलाच गोंधळ उडाला. पदाधिकारी निवडीची माहिती एकमेकांच्या माध्यमातून फोनवर घेणे सुरू असतानाच काही पदाधिकाऱ्यांनी थेट मातोश्रीशी संपर्क केला. या संपूर्ण प्रकरणानंतर यासंदर्भात कोणाचीही परवानगी न घेता परस्पर नावे जाहीर करण्यात आले असल्याची माहिती समोर आल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये सुरू झाली.

दरम्यान याबाबतची कल्पना मातोश्रीमधील पदाधिकाऱ्यांना आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव विनायक राऊत यांनी थेट या संदर्भात आदेश काढत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदाधिकारी निवड प्रक्रिया ही स्थगित करण्याचे आदेश कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

Matoshree issues strict orders after an unauthorized appointment announcement by a Thackeray Shiv Sena district chief in Kolhapur, highlighting internal discipline and leadership authority.
Kolhapur ZP Election : महाडिक, आबिटकर, आणि पाटलांचे मनसुबे मुश्रीफांनी उधळले, भाजप शिवसेनेला गाफील ठेवलं, आता अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार

महापालिकेसह, झेडपीमध्येही पक्षाची वाताहत

कोल्हापूर महापालिकेमध्ये जागा वाटपात पक्ष मॅनेज झाला असल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये होती. त्यामुळे अनेकांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. जिल्हाप्रमुखांच्या भूमिकेवर अनेकांनी संशय व्यक्त केला. त्यांच्या हट्टापायी काँग्रेसला देखील सत्तेपासून दूर राहावे लागले. त्याचा परिणाम थेट जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर देखील झाला.

Matoshree issues strict orders after an unauthorized appointment announcement by a Thackeray Shiv Sena district chief in Kolhapur, highlighting internal discipline and leadership authority.
Kolhapur ZP Result : कोल्हापूरमध्ये काँग्रेसला मोठा झटका; जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता!

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने देखील ठाकरे यांच्या शिवसेनेला दूर ठेवल्याचे चित्र पाहायला मिळाले. महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढत असताना पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघामधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार दिला. महापालिकेबरोबर ग्रामीण भागातील शिवसैनिक ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर नाराज आहे ही वस्तुस्थिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com