Imtiaz Jaleel: बरं झालं, संजय शिरसाट यांच्यावर जे आरोप केले, ते आता कोर्टात पुराव्यासह सांगणार; इम्तियाज जलील यांचं मोठं विधान

Sanjay Shirsat Vs Imtiaz Jaleel: शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन आर्थिक गैरव्यवहार, हाॅटेल, जमीन खरेदी, एमआयडीसीतील भूखंड खरेदी केल्याचा आरोप केला होता. बेकाददा जमीन वाटप आणि बेहिशेमी मालमत्ता जमवल्याचे सांगत इम्तियाज यांनी खळबळ उडवून दिली होती.
Sanjay Shirsat Imtiaz Jaleel
Sanjay Shirsat Imtiaz JaleelSarkarnama
Published on: 
Updated on: 

Chhatrapati Sambhajinagar News : संजय शिरसाट यांच्यावर मी जे आरोप केले, ते जाहीरपणे, पुराव्यासह केले आहेत. माझ्याविरोधात त्यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यावर आता न्यायालयात सुनावणी होणार आहे. मला त्याबद्दलचा समन्सही आला आहे. माझ्या दृष्टीने हे चांगले झाले आहे, जे आरोप मी जाहीरपणे, माध्यमांमध्ये केले होते आता ते मला कोर्टासमोर पुराव्यासह मांडण्याची संधी मिळाली आहे, अशा शब्दात आपण न्यायालयात बाजू मांडणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन आर्थिक गैरव्यवहार, हाॅटेल, जमीन खरेदी, एमआयडीसीतील भूखंड खरेदी केल्याचा आरोप केला होता. बेकाददा जमीन वाटप आणि बेहिशेमी मालमत्ता जमवल्याचे सांगत इम्तियाज यांनी खळबळ उडवून दिली होती. या आरोपानंतर संजय शिरसाट यांनी १३ जून २०२५ रोजी इम्तियाज जलील यांच्याविरोधात जिल्हा सत्र न्यायालयात फौजदारी मानहानीची याचिका दाखल केली होती.

न्यायालयाने या प्रकरणी इम्तियाज जलील यांना नोटीस बजावल्यानंतर संजय शिरसाट यांनी तुम्ही खोटे आणि चुकीच आरोप कराल तर कारवाईला समोर तर जावेच लागेल, असे सांगत टीसीएस धर्मांतरण प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करण्यात आले आहे, याचा उल्लेख केला. आम्ही दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात न्यायलयाने प्रथमदर्शनी मानहानी होत असल्याचे निरीक्षण नोंदवत इम्तियाज यांना समन्स बजावले आहे. आता सुनावणी होईल, त्यानंतर काय कारवाई करायची हे कोर्ट ठरवेल, असे म्हटले आहे.

कोर्टाचा समन्स आल्यानंतर इम्तियाज जलील यांनीही यावर माध्यमांशी संवाद साधला. संजय शिरसाट यांच्यावर केलेला एकही आरोप आपण पुराव्याशिवाय केलेला नाही. पत्रकार परिषदेत देखील मी प्रत्येक पुराव्याचे कागद जे की सरकारी होते, ते दाखवले होते. फुल प्रूफ इव्हिडन्ससह मी या संदर्भात तक्रारही केली होती. आता जे मी बाहेर, माध्यमांसमोर बोलत होतो, ते न्यायालयात मांडण्याची संधी मला या समन्समुळे मिळणार आहे.

Sanjay Shirsat Imtiaz Jaleel
Radhakrishna Vikhe Patil : श्रीरामपूरच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी काय? विखे पाटलांचा 'वासरू-गाई'चा टोला; सभागृहात हशा!

मी घाबरेल, बोलणे बंद करेल असा शिरसाट यांचा समज झाला असेल तर तो चुकीचा आहे. इम्तियाज जलील त्यांच्यासमोर झुकणार नाही, मी लढणार, असा इशारा त्यांनी दिला. संजय शिरसाट यांच्या चेले-चपाटे यांनीही माझ्यावर खोट्या केसेस केलेल्या आहेत, पोलिसांमध्ये तक्रारी, गुन्हे दाखल करू, आपण सत्तेत आहोत, पालकमंत्री आहोत असे शिरसाट यांना वाटले होते. पण मी गप्प बसणार नाही, त्यांच्यासमोर झुकणार नाही, असेही इम्तियाज यांनी माध्यमांना सांगितले.

Sanjay Shirsat Imtiaz Jaleel
BJP-Akali Dal Alliance: 2019 ला ठाकरेंनी केलेली चूक बादलांनी टाळली; भाजपसोबत युतीची 'डील' फायनल करण्यापूर्वीच शहांसमोर ठेवल्या दोन मोठ्या अटी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.