Shirur voter list : नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर सोळा दिवसात 625 मतदार वाढले कसे? सुरेश धस, तहसिलदारांवर शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्याचा निशाणा!

Shirur voter list News : बोगस आधारकार्ड, रेशनकार्ड आणि पीटीआरच्या जोरावर बाहेरगावच्या व्यक्तींची नावे मतदारयादीत घुसवण्याचा हा कुटिल डाव असल्याचा संशय त्यांनी व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले.
Voting ink
Voting inkSarkarnama
Published on: 
Updated on: 

NCP (SP) News : बीड जिल्ह्यातील शिरूरमध्ये आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर मतदारयादीतील कथित बोगस मतदारांचा महाघोटाळा समोर आला आहे. अवघ्या सोळा दिवसांत तब्बल ६२५ नवीन मतदार नोंदणी अर्ज दाखल झाले असून, त्यातील २८७ अर्जदार थेट शिरूर शहराबाहेरील रहिवासी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी केला आहे.

बोगस आधारकार्ड, रेशनकार्ड आणि पीटीआरच्या जोरावर बाहेरगावच्या व्यक्तींची नावे मतदारयादीत घुसवण्याचा हा कुटिल डाव असल्याचा संशय त्यांनी व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले. शिरूर येथे पत्रकार परिषदेत महेबुब शेख यांनी निवडणूक यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. १ ते १६ ऑक्टोबर या अवघ्या १६ दिवसांत ६२५ अर्ज दाखल होणे आणि त्यातील २८७ जण शिरूरचे मूळ रहिवासी नसणे, ही साधी बाब नसून मोठे षडयंत्र असल्याचा दावा त्यांनी केला.

केवळ ऑनलाईन अर्ज स्वीकारून कागदपत्रांची प्रत्यक्ष स्थळपाहणी न करता काम करणाऱ्या प्रशासनाच्या भूमिकेबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. ​या संपूर्ण प्रकरणावरून त्यांनी तहसीलदार घोळवे यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर सवाल उपस्थित केले. प्रशासकीय यंत्रणा आमदार सुरेश धस यांच्या दबावाखाली काम करत आहे का? तहसीलदार घोळवे यांची भूमिका निष्पक्ष आहे का? अशी तोफ डागत त्यांनी संबंधित अधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली.

Voting ink
Maharashtra News Live Update : 'एक उमेदवार तिरडीवरच अर्ज भरायला, हा म्हणतोय लग्न लावून द्या, पदवीधरांचं नेमकं काय चाललंय ..'; आमदार धस

16 ऑक्टोबरनंतर दाखल झालेल्या अर्जांची आणि नव्याने समाविष्ट झालेल्यांची माहिती लपवून पारदर्शकतेला हरताळ फासला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. निवडणुकीत एक-दोन मतांचे काय महत्त्व असते. चुकीच्या पद्धतीने बाहेरगावच्या लोकांची नावे यादीत आल्यास स्थानिक जनतेच्या मतांच्या अधिकारावर मोठा अन्याय होईल. त्यामुळे बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) आणि संबंधित यंत्रणेच्या भूमिकेची कसून चौकशी झाली पाहिजे.

Voting ink
Maharashtra Live Update : तानाजी सावंतांच्या कार्यकर्त्याकडून रविराज साबळेंना घरात घुसून जिवे मारण्याची धमकी

प्रत्येक अर्जाची मूळ कागदपत्रांसह आणि प्रत्यक्ष घराघरांवर जाऊन पडताळणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. या कथित गैरप्रकाराची तातडीने आणि निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे, अन्यथा गांधीजींच्या सत्याग्रहापासून भगतसिंगांच्या संघर्षापर्यंतचा मार्ग अवलंबत तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महेबुब शेख यांनी प्रशासनाला दिला. चुकीच्या पद्धतीने एकही बोगस मतदार नोंदवू देणार नाही, असेही ते म्हणाले.

Voting ink
Satara DCC Bank : दोन जीवलग मित्रांनी प्रथमच एकमेकांविरोधात शड्डू ठोकला; सुनील खत्री मदतीची परतफेड करणार की चॅलेंज देणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.