Om Rajenimbalkar News : ओम राजेनिंबाळकर यांचे वडील पवनराजे यांच्या हत्याकाडांचा शनिवारी निकाल जाहीर झाला. भक्कम पुराव्याअभावी माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासहा सर्व आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. त्यामुळे न्यायाच्या प्रतीक्षेअत असलेल्या ओमराजेंना मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे.
आज 'फादर डे' निमित्त ओमराजे यांनी आपल्या वडिलांच्यासोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत त्यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत.
सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये ओमराजे यांनी म्हटले आहे की, भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी.
ओमराजे हे आज धाराशिवकडे रवाना झाले आहेत. ठाकरेंच्या बंडखोरी केलेल्या खासदारांमध्ये त्यांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांचा पुढील निर्णय काय असेल याची चर्चा सुरू झाली आहे.
पवनराजे हत्याकांडामध्ये न्याय झाला नाही. आमचा परिवार मागील 20 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत होता. सीबीआय आता काय निर्णय घेते याकडे आमचे लक्ष आहे, असे देखील त्यांनी सांगितले. या निर्णयाविरोधात सीबीआय उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती आहे.
बंड केलेल्या सहा खासदारांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केला आहे. या खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेते जाणार असल्याची माहिती आहे. नागेश पाटील अष्टेकर यांनी तर मी शिवसेनेतून शिवसेनेत जात असल्याचे म्हटले आहे. तर, ओमराजे यांनी आपण आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून उद्या निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.