Shivsena News : एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर रात्री खलबते, सत्तारांकडून तक्रारींचा पाढा; आमदारांनीही सांगितला भाजपचा जाच!

Shiv Sena rebellion News : नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकींमध्ये भाजपच्या दबावाला बळी पडत शिवसेनेने अनेक ठिकाणी नमते घेतले.
Shivsena leader
Shivsena leader Sarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde-Abdul Sattar News : विधान परिषदेच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेतील खदखद बाहेर येऊ लागली आहे. सतरा पैकी मराठवाड्यातील जालना-छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा शिवसेनेला गमवावी लागली. नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकींमध्ये भाजपच्या दबावाला बळी पडत शिवसेनेने अनेक ठिकाणी नमते घेतले.

त्यामुळे याच निवडणुकीतील संख्याबळाचा आधार घेत भाजपने (BJP) शिवसेनेकडे असलेली जालना-छत्रपती संभाजीनगरची जागा ताब्यात घेतली. याचे पडसाद शिवसेनेत उमटले आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी बंडाचे निशाण फडकावत मुलाचा उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीला तडा जाण्यास ही घटना कारणीभूत ठरू शकते यांची चाहुल लागताच एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांच्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा आमदार आणि खासदार संदीपान भुमरे यांना मंगळवारी तातडीने ठाण्यात बोलावून घेतले होते.

Shivsena leader
Maharashtra News Live Update: अमित शाहांसोबतच्या बैठकीनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,10 लाख टन कांदा...
Shivsena leader
Maharashtra Politics Live Update : विधानपरिषदेसाठी भाजपकडून ११ उमेदवारांची नावे जाहीर

ठाण्याचा बंगल्यात रात्री उशीरापर्यंत खलबतं सुरू होती. आक्रमक अब्दुल सत्तार यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडूनच कसा त्रास दिला जात आहे, निधी वाटपात माझ्या मतदारसंघाला कसे डावलले गेले? यासह इतर तक्रारींचा पाढा वाचला. शिंदे यांनी सत्तार यांचे ऐकून घेत मी शिरसाट यांच्यांशी बोलतो असे सांगितले.

Shivsena leader
Maharashtra MLC election: विधान परिषदेच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये रणकंदन! संख्याबळावरून मित्रपक्षात जोरदार खडाजंगी; उपमुख्यमंत्र्यांच्या 'ठाण्या'सह 7 जागांवरून ठिणगी!

प्रत्येक विधानसभा मतदारसंघ व त्याचे प्रतिनिधित्व करणारे संजय शिरसाट, प्रा. रमेश बोरनारे, संजना जाधव, विलास भुमरे यांच्याशी त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न भाजपची संघटनात्मक ताकद, मिळणारा विकास निधी या सगळ्याचा आढावा घेतला. विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा धर्म प्रत्येकाने पाळायचा आहे, अशा सूचनाही शिंदे यांनी बैठकीत दिल्या.

Shivsena leader
MLC Election News : विधानपरिषदेचा धुरळा : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर भाजपचे वर्चस्व; संभाजीनगर-जालना मतदारसंघात कमळ फुलणार?

शिवसेनेतील (Shivsena) पक्षांतर्गत गटबाजीवर एकनाथ शिंदे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत सगळ्यांना सोबत घेऊन काम करा. शिवसेनेची ताकद प्रत्येक विधानसभा मतदारसंघ आणि जिल्ह्यात आहे, ती अधिक कशी वाढेल? यासाठी एकजुटीने काम करा, असे आवाहनही शिंदे यांनी या बैठकीत आमदारांना केले. भाजपकडून मिळणाऱ्या वागणूकीबद्दलच्या तक्रारी संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी बोलू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Shivsena leader
Marathwada Shivsamvad tour: निवडणुकीच्या नादात 22 गुंठे जमीन विकली, भाजप उमेदवाराकडून पराभव; संकटात सापडलेल्या शिवसैनिकाला मदतीचा हात

अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांना भेटणार?

दरम्यान, अब्दुल सत्तार यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समज देत विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय जालना-स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून दाखल केलेला मुलाचा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले आहे. गुरुवारी माघारीचा शेवटचा दिवस आहे, कदाचित आज संध्याकाळपर्यंत सत्तारांच्या मुलाची उमेदवारी मागे घेतली जाईल, असे बोलले जाते. मंगळवारी एकनाथ शिंदे यांची भेट आणि चर्चा झाल्यानंतर सत्तार बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

Shivsena leader
MLC Election News : विधानपरिषदेचा धुरळा : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर भाजपचे वर्चस्व; संभाजीनगर-जालना मतदारसंघात कमळ फुलणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com