Lok Sabha Election 2024 : शिवसेना-भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीवर आव्हाडांना आक्षेप; थेट आयोगाकडे तक्रार...

Jitendra Awhad News : "हा प्रकार म्हणजे निवडणूक आचारसंहितेचा सर्वात मोठा भंग आहे."
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. देशभरात एकूण सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. यासाठी आदर्श आचारसंहिता निवडणूक आयोगाकडून लागू करण्यात आला आहे. मात्र, आता शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीवर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला आहे. (Latest Marathi News)

Lok Sabha Election 2024
Sharad Pawar NCP Candidates first list : शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; 'या' पाच उमेदवारांची केली घोषणा!

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) पत्रकार परिषदेत म्हणाले, "लोकसभेच्या निवडणुका खुल्या, मोकळ्या आणि निकोप वातावरणात व्हाव्यात, ही बजाबदारी निवडणूक आयोगाची आहे. कालपासून पक्षांचे स्टार कॅम्पेनर्सची यादी बाहेर येत आहे. आम्ही आयोगाकडे तक्रार केली आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन चुका केल्या आहेत. शिंदे यांनी आपल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नावे दिली आहेत. त्याचप्रमाणे भाजपने त्यांच्या यादीत एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं नाव नमूद केले आहे."

Lok Sabha Election 2024
Sunil Shelke News: जयंत पाटील दुसऱ्या पक्षात गेले तर आव्हाड आणि रोहित पवार कारणीभूत
Lok Sabha Election 2024
NCP Complaint : शरद पवार गटाची तक्रार; पण निवडणूक आयोग शिवसेना, भाजपवर 'ॲक्शन' घेणार का ?

"आयोगाच्या (Election Commission) नियमानुसार कोणाची नावे अशा यादीत टाकू शकता, याची स्पष्टता दिली आहे. मात्र, या पक्षांनी अशा पद्धतीने नावं वापरली असतील तर निवडणूक आयोगाला त्यांच्यावर बंदी घालण्याचा अधिकार आहे. हा प्रकार म्हणजे निवडणूक आचारसंहितेचा सर्रास केलेला सर्वात मोठा भंग आहे. तुम्ही दुसऱ्या पक्षांच्या नेत्यांना आपल्या पक्षाच्या यादीत टाकू शकत नाही," असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com