Beed News : मराठवाडा एकेकाळी एकसंध शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मात्र, गेल्या काही दिवसापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठे धक्के सहन करावे लागत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना बॅकफुटवर गेली आहे. त्यामुळे आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा संघटना बाधंणीवर लक्ष केंद्रित केले आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकताच बीड जिल्ह्याला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी बीड विधानसभा मतदारसंघातील 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद साधला. पक्षसंघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. त्यामुळे येत्या काळात बीड जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलणार आहेत.
बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मोठ्या प्रमाणात पीछेहाट झाली होती. त्यामुळे त्यांनी बीड जिल्ह्यावर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे बीड विधानसभा मतदारसंघातील 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद साधण्यासाठीच्या कार्यक्रमाचे आयोजन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार करण्यात आले होते. यावेळी संपर्क नेते व आमदार अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
यावेळी बीड जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, विधानसभा प्रमुख मुजीब शेख, आणि तालुकाप्रमुख यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने प्रत्येक बूथप्रमुखासाठी एक विशेष पॉलिसी जाहीर करण्यात आली. वार्षिक 500 रुपये हप्त्याने 10 लाखांची ही पॉलिसी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने काढण्यात आली आहे.
दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले गेल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. भविष्यात दोन कोटी घुसविले जातील, खरे की खोटे कुणाला कळणार आहे? अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमावेळी प्रातिनिधिक स्वरूपात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 20 बूथप्रमुखांना या पॉलिसीचे वाटप करण्यात आले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी हा एक अभिमानाचा क्षण असल्याचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी नमूद केले. 396 बूथप्रमुखांना पॉलिसी देण्यात आल्याने यामुळे येत्या काळात कार्यकर्त्याला 'सुरक्षा कवच' मिळणार आहे. त्यामुळे येत्या काळात बीड जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.