Parbhani News: परभणी महापालिकेत 'नारी शक्ती'! विषय समित्यांच्या ११ पैकी आठ अध्यक्षपदांवर महिला

नारीशक्ती विधेयक लोकसभेत पास झाले नसले तरी परभणी महापालिकेत मात्र 'नारी शक्ती'चा विजय झाल्याचे दिसून आले.
Parbhani Mahanagarpalika .jpg
Parbhani Mahanagarpalika .jpgSarkarnama
Published on
Updated on

Parbhani News: देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात महिलांना आरक्षण देण्यासाठी मोदी सरकारने आणलेले 'नारी शक्ती वंदन' विधेयक लोकसभेत बहुमताअभावी नामंजूर झाले. यावरून भाजप देशभरात विरोधकांविरोधात रस्त्यावर उतरला आहे. नारीशक्ती विधेयक लोकसभेत पास झाले नसले तरी परभणी महापालिकेत मात्र 'नारी शक्ती'चा विजय झाल्याचे दिसून आले.

Parbhani Mahanagarpalika .jpg
Sanjay Nirupam: आरटीओ अधिकारी ऑटो चालकांची 'मराठीची टेस्ट' घेणार! परप्रांतियांचं धाबं दणाणलं; GRवर निरुपम यांनी व्यक्त केली चिंता

विषय समित्यांच्या निवडणुकीत अकरांपैकी आठ अध्यक्षपदांवर महिला नगरसेवकांची निवड झाल्याने खऱ्या अर्थाने येथे 'नारी शक्ती' दिसून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महानगरपालिकेच्या सभापती निवडीसाठीची प्रक्रिया शुक्रवारी पार पडली. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी काम पाहिले. सर्व अकरा समित्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे यावेळी घोषित करण्यात आले.

Parbhani Mahanagarpalika .jpg
Kejriwal house controversy : पुन्हा एकदा केजरीवालांच्या नव्या 'शीशमहल'ची चर्चा! घराच्या फोटोवरून भाजप-आप आमने-सामने

स्थायी समिती अध्यक्षपदी प्रतिभा सरोदे, प्रभाग समिती व अध्यक्ष रईस खान सरफराज खान, प्रभाग समिती 'ब' अध्यक्ष खान मुसद्दीक खान नूरूल्ला खान, प्रभाग समिती 'क' अध्यक्षपदी तब्बसूम वसीम शेख, गलिच्छ वस्ती निर्मूलन घरबांधणी व समाज कल्याण समिती अध्यक्षपदी राजेश रणखांबे, महिला व बालकल्याण समिती अध्यक्षपदी अश्विनी जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.

Parbhani Mahanagarpalika .jpg
Pune rickshaw license rule : महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी निर्णय कोणत्याही दबावाखाली बदलू नये; शिवतारेंचे फडणवीस, शिंदे यांना पत्र

तसेच स्थापत्य समिती अध्यक्षपदी सायरा बेगम अलीमुद्दीन, वैद्यकीय सहाय्यक आरोग्य समिती अध्यक्षपदी अबोली कांबळे, विधी व महसूल वाढ समिती अध्यक्षपदी रुखसाना बेगम सय्यद अब्दुल हमीद जागीरदार, शहर सुधार समिती अध्यक्षपदी शुभांगी पाष्टे, माध्यमिक पूर्व-माध्यमिक तांत्रिक समिती अध्यक्षपदी शमशाद बेगम सय्यद इलाही आदींचा यात समावेश आहे.

Parbhani Mahanagarpalika .jpg
नाशिकच्या कुंभमेळ्यात कुणीच हरवणार नाही, ‘कुंभदूत’ करणार प्रत्येकाला मदत..

नवनिर्वाचित अध्यक्षांची बिनविरोध निवड जाहीर झाल्यानंतर मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील, गटनेते दिलीप सिंह ठाकूर यांची उपस्थिती होती. शहरातील नागरिकांचे मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांनी सहकार्य करण्याची अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com