Yedshi fire tragedy : धाराशिव जिल्ह्यातील अग्नितांडवानंतर ओम राजेनिंबाळकरांचा तडकाफडकी एकनाथ शिंदेंना फोन; तातडीने केली मदतीची घोषणा, एका कॉलवरच प्रशासनाची चक्रे फिरली!

Yedshi fire tragedy News : ही आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास आता इन्व्हेस्टिगेशन टीमकडून सुरू आहे. त्यातच सोमवारी सकाळी घटनास्थळी जाऊन खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी पाहणी केली.

eknath shinde, om rajenimbalkar
eknath shinde, om rajenimbalkar Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथे लक्ष्मीपूजनाच्या रात्रीच आगीची घटना घडली. यामध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी झाला तर कुटुंबातील फक्त एक मुलगा वाचला आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास आता इन्व्हेस्टिगेशन टीमकडून सुरू आहे. त्यातच सोमवारी सकाळी घटनास्थळी जाऊन खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तातडीने फोन केला. त्यानंतर तातडीने मदतीबाबत मोठी घोषणा केली. त्यासोबतच त्यांच्या एका कॉलनंतर प्रशासनाची चक्रे वेगानी फिरली.

धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावात एका घराला लागलेल्या आगीत सहा जणांचा होरापळून मृत्यू झाल्याची घटना ऐन दिवाळीत घडल्यामुळे संपूर्ण राज्यभरातून हळहळ व्यक्त होत आहे. सोमवारी सकाळी घटनास्थळी जाऊन खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांना तातडीने फोन केला.

जय महाराष्ट्र साहेब, ओम बोलतोय, आमच्या धाराशिव जिल्ह्यात येडशी म्हणून एक गाव आहे, तिथे एका किराणा दुकानाला आग लागून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व जण एकाच कुटुंबातील होते, अशी माहिती यावेळी ओम राजेनिंबाळकर (Om rajenimbalkar) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. त्यासोबतच त्यांनी एकनाथ शिंदे यांना अशी यावेळी विनंती देखील केली की, धाराशिवच्या नगरपालिकेला अग्निशमनच्या गाड्या असणे गरजेचे आहे. दरम्यान, ओमराजे यांची मागणी ऐकताच शिंदे यांनी लगेच होकार दिला, तुमची मागणी पूर्ण करून देतो, तुम्ही फक्त नगरपालिकेच्या वतीने प्रस्ताव पाठवा असे शिंदे यावेळी म्हणाले.


eknath shinde, om rajenimbalkar
Dharashiv Fire Tragedy : करंडे कुटुंबासाठी काळी दिवाळी! लक्ष्मीपूजनाच्या रात्री एकाच कुटुंबातील 6 जणांचा होरपळून मृत्यू

दरम्यान, या कुटुंबाचं प्रचंड नुकसान झाले आहे, सहा जणांचा मृत्यू झाला आहे, या घटनेत त्या कुटुंबातील फक्त एक मुलगा वाचला आहे. मुख्यमंत्री सहय्यता निधीमधून देखील काही मदत करावी, असेही यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांना म्हटले. यावर बोलताना मी मदत करतो, असे आश्वासन यावेळी शिंदे यांनी दिले, तसेच मी आता लगेच कलेक्टरला फोन करतो, असेही यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.


eknath shinde, om rajenimbalkar
Omraje Nimbalkar Join Shivsena : ओमराजे निंबाळकर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत, कार्यकर्त्यांना थेट सांगितले,...

घटनेचा इन्व्हेस्टिगेशन टीमकडून तपास सुरु

दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास आता इन्व्हेस्टिगेशन टीमकडून सुरू आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मीपूजनासाठी लावलेल्या पणतीमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. तपास यंत्रणांकडून घटनास्थळाची पाहणी करून, पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे.


eknath shinde, om rajenimbalkar
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नेत्यांना नेमका काय फायदा होतो? निवडणुकीपासून सत्तेपर्यंतचं गणित

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.