Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंच्याविरोधात निकाल का लागला? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर

MLA Disqualification Case : सर्वोच्च न्यायालयाने जे मुद्दे मांडले होते. त्याचा विस्तृत निकाल विधानसभाध्यक्षांनी दिला आहे, असेदेखील फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Political News : विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर त्यांना ठाकरे गटाकडून टार्गेट केले जात आहे. हा निकाल कायदेशीर बाबींना धरून नाही, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला, तर उद्धव ठाकरे यांनी ते सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे स्पष्ट केले. ठाकरे गट आक्रमक झालेला असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालाबाबत महत्त्वाची बाब ठाकरे गटाच्या लक्षात आणून देत उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

Devendra Fadnavis
Prakash Ambedkar : अध्यक्षांनी फक्त औपचारिकता पार पाडली; आंबेडकरांचे निकालावर सूचक विधान

शिवसेनेच्या घटनेप्रमाणेच उद्धव ठाकरेंची निवड झाली नव्हती. शिवसेनेच्या घटनेनुसार निकाल देण्यात आला आहे. सर्व बाजू तपासून संविधानानुसार अध्यक्षांनी निकाल दिला, असे म्हणत शिवसेनेच्या घटनेनुसार ठाकरे अपात्र ठरल्याचे फडणवीसांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने जे मुद्दे मांडले होते, त्याचा विस्तृत निकाल विधानसभाध्यक्षांनी दिला आहे, असेदेखील फडणवीस म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कायदेशीर निकाल अध्यक्षांनी दिला आहे. तांत्रिक बाबींमुळे ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरले नाहीत. याविषयी कायदेतज्ज्ञ विस्तृतपणे सांगू शकतील, असे फडणवीस म्हणाले. तसेच कालच्या निकालामुळे ठाकरेंची जी स्ट्रॅटेजी होती ती फ्लॅट झाली आहे, असा टोलादेखील फडणवीसांनी लगावला. तसेच ठाकरेंना निकाल मान्य नसल्याने त्यांना सुप्रीम कोर्टाचा रस्ता मोकळा आहे, असेदेखील फडणवीस यांनी सांगितले.

34 याचिकांवर झाली सुनावणी

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे आणि शिंदे गट यांच्यासंदर्भातील तब्बल 34 याचिकांची सुनावणी बुधवारी केली. जवळपास एक तास अध्यक्ष निकालाचे वाचन करीत होते. या निकालात ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरले नाहीत. मात्र, मूळ पक्ष आणि प्रतोदपदाचा निकाल मात्र शिंदें गटाच्या बाजूने लागला. शिंदे गटातील आमदार अपात्र ठरतील, ही शक्यता शेवटी खोटी ठरली.

R...

Devendra Fadnavis
ShivSena MLA Disqualificaiton case : निकालावरून बाहेर झोंबाझोंबी, सभागृहात...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com