
Mumbai News : मराठीच्या मुद्यावर एकत्र आलेलया राज आणि उद्धव ठाकरे यांनी वरळीत शनिवारी विजयी मेळावा घेतला. या मेळाव्यानंतर राज्यभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. एकीकडे मनसे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जल्लोष केला तर दुसरीकडे महायुतीमध्ये हे दोन पक्ष एकत्र आल्यानंतर सावध प्रतिक्रिया दिली जात आहे. त्यातच या मेळाव्यानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप -प्रत्यारोपाला उधाण आले आहे. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी विजयी मेळाव्यावर टीका केली. त्या टीकेनंतर मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी शेलार यांना त्याच भाषेत सुनावले.
सरकारने त्रिभाषा सूत्राचे दोन्ही निर्णय रद्द केल्यानंतर शनिवारी मुंबईत विजयी मेळावा पार पडला. या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) उपस्थित होते. या मेळाव्यानंतर आता राजकीय वर्तुळातुन आरोप -प्रत्यारोप केले जात आहेत.
शिवसेनेचे (Shivsena) मंत्री प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिले आहे, त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर दुसरीकडे भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील या मेळाव्यावरून मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
शेलार यांनी निशाणा साधताच त्यांना त्यांच्या भाषेतच प्रकाश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंचे भाषण “अप्रासंगिक”, तर राज ठाकरेंचं “अपूर्ण” होते. “त्रिभाषा सूत्र”चा उल्लेख त्यांनी न करता, चुकीच्या माहितीवर आधारित विधान केले असल्याची टीका शेलार यांनी केली होती.
शेलार यांनी केलेलया टीकेचा मनसे नेते प्रकाश महाजन यांनी जोरदार समाचार घेतला. शेलार यांना सांस्कृतिक म्हणावे की असांस्कृतिक? असा सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी यावरून आशिष शेलार आणि प्रताप सरनाईक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी यावेळी भाजपला देखील शेलक्या शब्दांत सुनावले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.