Women Reservation Bill: मोदी सरकारनं ताकद लावलेलं महिला आरक्षण विधेयक लोकसभेत पडलं, सुनेत्रा पवारांनी कोणावर फोडलं खापर?

NDA Government : केंद्रातील भाजपप्रणित एनडीए सरकारला गेल्या 12 वर्षांत पहिल्यांदाच लोकसभेत मोठा धक्का बसला आहे. महिला आरक्षण अर्थात नारी शक्ती वंदन आणि मतदारसंघ फेररचना विधेयक लोकसभेत नामंजूर करण्यात आलं. काँग्रेससह विरोधकांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे छाती ठोकून कोणतंही विधेयक पास करण्यासाठी ओळखल्या जात असलेल्या मोदी सरकारवर मोठी नामुष्की ओढवली
Sunetra Pawar Women Reservation Bill.jpg
Sunetra Pawar Women Reservation Bill.jpgSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : केंद्रातील भाजपप्रणित एनडीए सरकारला गेल्या 12 वर्षांत पहिल्यांदाच लोकसभेत मोठा धक्का बसला आहे. महिला आरक्षण अर्थात नारी शक्ती वंदन आणि मतदारसंघ फेररचना विधेयक लोकसभेत नामंजूर करण्यात आलं. काँग्रेससह विरोधकांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे छाती ठोकून कोणतंही विधेयक पास करण्यासाठी ओळखल्या जात असलेल्या मोदी सरकारवर मोठी नामुष्की ओढवली.महिला आरक्षण विधेयक लोकसभेत फेल ठरल्यानंतर राजकीय वर्तुळात सर्वपक्षीय नेतेमंडळींच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

राज्याच्या उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर शनिवारी(ता.18 एप्रिल) सोशल मीडियावरील X वर पोस्ट शेअर करत मोठं भाष्य केलं आहे. त्यांनी कालचा दिवस आपल्या भारतीय लोकशाहीसाठी लाजिरवाणा ठरलाय असं म्हणणं वावगं ठरणार नाही असं म्हटलं आहे.

सुनेत्रा पवार पोस्टमध्ये म्हणतात, महिलांना 1/3 आरक्षण देणारं 131वं घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकलं नाही. तथापि जाणीवपूर्वक होऊ दिलं नाही आणि विरोधकांची महिला-विरोधी मानसिकता पुन्हा उघडी पडली. महिला सशक्तीकरणाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनीच महिलांच्या हक्कावर घाला घातल्याचा आरोप करत विरोधकांवर हल्लाबोल केला.

तसेच त्यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या एकत्र येण्याच्या आवाहनाला नकार हा अहंकार नव्हे तर देशातील महिलांवर केलेला अन्यायचं आहे. पण महिला आरक्षणाची लढाई इथे थांबणार नाही…नारीशक्ती उत्तर देईल! असा विश्वासही सुनेत्रा पवार यांनी एक्सवरील पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

Sunetra Pawar Women Reservation Bill.jpg
Devendra Fadnavis Breaking : होम मिनिस्ट्रीमध्ये मोठ्या हालचाली : 5 प्रकरणांनी वाढवली डोकेदुखी; CM फडणवीसांकडून 'मॅरेथॉन' बैठक

मोदी सरकारनं आणलेलं महिला आरक्षण विधेयक लोकसभेत शुक्रवारी(ता.17) अधिनियमासह 103 वी घटना दुरुस्ती विधेयक दोन तृतीयांश बहुमताअभावी फेटाळलं गेलं. यामुळे भाजपप्रणित एनडीए सरकारला मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडं 2023 मध्ये पारित केलेलं महिला आरक्षण विधेयक सरकारनं तात्काळ लागू करावं, त्याला आमचा शतप्रतिशत पाठींबा असल्याचं काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीचं म्हणणं आहे.

या सगळ्या राजकीय घडामोडींनंतर आता भाजपसह एनडीएच्या गोटात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीप्रमाणं शनिवारी(ता.18) रात्री 8.30 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. याबाबतची माहिती पंतप्रधान कार्यालयानं दिली आहे. मोदी कदाचित महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर पंतप्रधान बोलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Sunetra Pawar Women Reservation Bill.jpg
Vidhan Parishad Election: उद्धव ठाकरे प्लॅन बदलणार, मराठवाड्यात भाजपला रोखण्यासाठी मोठी खेळी? विधान परिषदेसाठी लढवय्या नेता मैदानात उतरवणार

केंद्रीय मंत्रिमंडळाची नारी शक्ती वंदन विधेयक फेटाळल्यानंतर आज सकाळी बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना इशारा देताना विधेयकाला पाठिंबा न दिल्यानं त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील असं म्हटल्याचं सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार समोर येत आहे. त्याचबरोबर भाजपकडून गावागावात जाऊन काँग्रेसनं कसा महिला आरक्षणाला विरोध केला याचा प्रचार करण्याच्या सूचनाही दिल्याचं कळतं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com