

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीने राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करत शासन आणि प्रशासनाला इशारा दिला आहे. येत्या 10 डिसेंबर रोजी राज्यातील सर्व विभागीय कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असून, त्यानंतर हिवाळी अधिवेशनावर धडक देण्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही या प्रश्नांवर ठोस निर्णय होत नसल्याने कामगार संघटनांमध्ये नाराजी वाढली आहे. त्यामुळे आता आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा निर्णय संयुक्त कृती समितीने घेतला आहे.
या आंदोलनात एसटी महामंडळाच्या धोरणांनाही विरोध करण्यात येणार आहे. महामंडळासाठी ई-बसेस भाडेतत्त्वावर घेण्याच्या निर्णयावर कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच एसटी महामंडळाच्या मालकीच्या जमिनी खासगी तत्त्वावर देण्याच्या धोरणालाही संघटनांचा विरोध आहे. महामंडळातील वाढते कंत्राटीकरण थांबवावे, अशी मागणीही कामगारांकडून करण्यात येत आहे. या निर्णयांमुळे महामंडळाच्या भवितव्यावर परिणाम होण्याची भीती संघटनांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यांचाही या आंदोलनात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. 2016 पासूनची वेतन थकबाकी आणि 2018 पासूनचा प्रलंबित महागाई भत्ता तातडीने देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून थकलेली आर्थिक देणी मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
यापूर्वीही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, आता पुन्हा एकदा संयुक्त कृती समितीने आंदोलनाची हाक दिल्याने एसटी महामंडळातील कामगार प्रश्न चर्चेत आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.