Maharashtra ST Strike : ऐन दिवाळीत ST कर्मचाऱ्यांकडून संपाचे हत्यार : ऊस आंदोलनामुळे होणारे प्रवाशांचे हाल आणखी वाढणार

INTUC MSRTC Employees Strike : ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर जाणार आहेत. इंटक संघटनेने विविध मागण्यांसाठी संपाची घोषणा केली आहे.
ST Strike
ST StrikeSarkarnama
Published on: 
Updated on: 

ST News : ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या संप पुकारण्यात आला आहे. या विषयीची घोषणा संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी देण्यासह विविध प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी आणि महामंडळाच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात शनिवारी (ता.७) बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.

एसटी महामंडळाच्या सुमारे ८५० ठिकाणांवरील ३,५०० एकर जमिनी ९८ वर्षांच्या दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्यावर (PPP तत्त्वावर) देण्याचा निर्णय शासनाने ८ ऑक्टोबर २०२६ च्या शासन निर्णयाद्वारे घेतला आहे. यामुळे एसटीच्या मोक्याच्या जागा धनदांडग्यांच्या घशात जाऊन महामंडळाचे अस्तित्वच धोक्यात येईल. त्यामुळे हा शासन निर्णय रद्द करून जमिनींचा विकास शासनाने स्वतः करावा, अशी ठाम मागणी इंटकने केली आहे.

याशिवाय, प्रस्तावित १७,८७६ पदांची कंत्राटी भरती रद्द करून नियमित भरती करावी आणि 'इव्हे ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीकडून प्रति किलोमीटर ७३ दराने ५,१५० इलेक्ट्रिक बसेस भाड्याने घेण्याचा करार रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या करारांमुळे महामंडळाचे कोट्यवधींचे आर्थिक नुकसान होत असून स्वतःच्या मालकीच्या बसेस वाढवण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, असे तिगोटे यांनी स्पष्ट केले.

ST Strike
ST Bus: 78 वर्षांची प्रतीक्षा संपली! 'या' गावात पहिल्यांदाच धावली लालपरी; गावकऱ्यांनी केला ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष

कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या

शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी, वेतन आणि सेवा-सवलती लागू करणे.

९७ महिन्यांची ११५% महागाई भत्ता थकबाकी, ६०% दराने महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ थकबाकी अदा करणे.

जमिनींचा ९८ वर्षांचा भाडेपट्टा, कंत्राटी भरती व भाडेतत्त्वावरील बस करार रद्द करणे.

कर्मचाऱ्यांना २५ हजार दिवाळी भेट देणे.

संप कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी

तिगोटे यांनी सांगितले की, हा संप कोणत्याही पक्षाविरोधात नसून एसटीचे सार्वजनिक अस्तित्व आणि कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आहे. संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये हीच आमची इच्छा आहे, पण ठोस निर्णय घेणे ही सरकारची जबाबदारी आहे. तसेच सर्व श्रमिक संघटनांना या संपात सहभागी होण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

ST Strike
ST Strike: ऐनदिवाळीतच फडणवीस सरकारसमोर मोठं संकट? 'एसटी' कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा? भाजप आमदार पडळकरांची भूमिका आली समोर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.