Chandrapur Politics : ऐन दिवाळीत शिंदेंच्या जिल्हाप्रमुखाला अटक! जिवतोडे यांच्या घरात घुसून पोलिसांची कारवाई; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

Shinde Shivsena Chandrapur District Chief Mukesh Jiwatode Arrested : शिंदेंच्या शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांना त्रिशूल आंदोलन प्रकरणात घुग्घुस पोलिसांनी अटक केली आहे.
Chandrapur Shivsena District Chief Mukesh Jiwatode Arrest; Eknath Shinde
Chandrapur Shivsena District Chief Mukesh Jiwatode Arrest; Eknath ShindeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Chandrapur News : ऐन दिवाळीच्या सणात शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांना घुग्घुस पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसांपूर्वी झालेल्या त्रिशूल आंदोलन प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात राजकीय पक्षाच्या जिल्हाप्रमुखावर झालेल्या या कारवाईमुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

वेकोली (WCL) प्रशासनाविरोधात स्थानिक बेरोजगार, शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली त्रिशूल आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाशी संबंधित प्रकरणाच्या तपासादरम्यान आवाजाचे नमुने देण्यासाठी मुकेश जिवतोडे यांना पोलिसांसमोर उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली होती.

मात्र, दिवाळीचा सण असल्याने तसेच आपण मुंबईत असल्यामुळे दिवाळीनंतर पोलिसांसमोर हजर राहण्याची मुभा द्यावी, अशी विनंती जिवतोडे यांनी केली होती. असे असतानाही पोलिसांनी ऐन दिवाळीच्या दिवशी त्यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

Chandrapur Shivsena District Chief Mukesh Jiwatode Arrest; Eknath Shinde
Shivsena Politics: 'एका जीवानं, ताकदीनं शिवसेना एकत्र झाली तर...'; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच शिंदेंच्या खासदाराचं मोठं विधान

'प्रशासनाकडून सत्तेचा गैरवापर'

या कारवाईनंतर मुकेश जिवतोडे यांनी पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. "आम्ही सत्तेत असलो तरी प्रशासनाकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे," असे म्हणत त्यांनी या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली.

'दिवाळीत घरात लहान मुले, नातेवाईक असताना कारवाई'

दिवाळीच्या सणात पोलिसांनी घरी येऊन केलेल्या कारवाईमुळे कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे जिवतोडे यांनी सांगितले. ते म्हणाले, "दिवाळीचा सण सुरू आहे. घरी लहान मुले आणि नातेवाईक आलेले असताना पोलिसांनी अशा पद्धतीने घरी येऊन कारवाई करणे चुकीचे आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब मानसिक दबावाखाली येते."

तसेच, आपल्यावर खंडणी किंवा मारहाणीचा कोणताही गुन्हा दाखल नसल्याचा दावा त्यांनी केला. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि बेरोजगारांना रोजगार मिळावा, यासाठीच आपण आंदोलनात सहभागी झालो होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नोटिशीतील उल्लेखांवरही जिवतोडेंचा आक्षेप

यापूर्वी पोलिसांकडून पाठवण्यात आलेल्या नोटिशीबाबतही मुकेश जिवतोडे यांनी आक्षेप नोंदवला. नोटिशीत महिलांशी संबंधित तसेच दारू विक्रीचे गुन्हे दाखवून आपल्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणांशी आपला कोणताही संबंध नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Chandrapur Shivsena District Chief Mukesh Jiwatode Arrest; Eknath Shinde
Shivsena : उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे एकत्र येणार? ऐन दिवाळीत शिंदेंच्या आमदाराच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

दरम्यान, त्रिशूल आंदोलन प्रकरणातील कारवाईमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी आघाडीतीलच एका घटक पक्षाच्या जिल्हाप्रमुखावर झालेल्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता या प्रकरणावर शिवसेना (शिंदे गट) आणि प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Mann Ki Baat Controversy
Mumbai Police | Shivaji Park Protest
Elon Musk, Mukesh Ambani and Rahul Gandhi are at the centre of a debate over Starlink's India licence and satellite internet competition.
Delhi Protest Notice