Shivsena : उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे एकत्र येणार? ऐन दिवाळीत शिंदेंच्या आमदाराच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

Thackeray-Shinde Shivsena Merger : राज्यात एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात असतानाच शिंदेंच्या आमदारानेच दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे ऐन दिवाळीत राज्यातील राजकीय चर्चांना जोर आला आहे.
Uddhav Thackeray -Eknath Shinde
Uddhav Thackeray -Eknath ShindeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nandurbar News, 08 Nov : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला असतानाच आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना देखील एकत्र येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या चर्चांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या एका वक्तव्यामुळे सुरुवात झाली आहे.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले, तर तीच खरी दिवाळी असेल, असे सूचक वक्तव्य रघुवंशी यांनी केले आहे. माध्यमांशी बोलताना चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेतील फुटीबाबत खंत व्यक्त केली. ज्या दिवशी शिवसेना दुभंगली, तो अत्यंत दुर्दैवी प्रसंग होता. असा प्रसंग घडायलाच नको होता, असे ते म्हणाले. शिवसेनेत फूट पडणे ही दुर्दैवी बाब होती, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. दोघे एकत्र आले, तर तीच खरी दिवाळी असेल, असे रघुवंशी म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतेबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Uddhav Thackeray -Eknath Shinde
PMC : पुणे महापालिकेच्या नव्या मुख्यालयासाठी जागा ठरली? शिवाजीनगरमधील 'त्या' जागेवर लक्ष!

दरम्यान, राज्यात एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांनीही राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या असून, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी नेत्यांची ये-जा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीमुळेही या चर्चांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

Uddhav Thackeray -Eknath Shinde
Devendra Fadnavis news : महिला सरपंचांचे धाडस, थेट CM फडणवीसांनाच मागितली पोच पावती; राज्यात पहिल्यांदाच असं घडलं...

राज्यात एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात असतानाच शिंदेंच्या आमदारानेच दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे ऐन दिवाळीत राज्यातील राजकीय चर्चांना जोर आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.