Shivsena UBT: 'शिवसेनेतून शिवसेनेतच गेलोय' ठाकरेंची साथ सोडल्यानंतर नागेश पाटील आष्टीकरांचे मोठे विधान

Nagesh Patil Ashtikar, Shiv Sena, Uddhav Thackeray: हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केल्याची पुष्टी केली. विकासकामांसाठी सत्तेत असणे गरजेचे असल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Uddhav Thackeray Birthday Wish Nagesh patil Ashtikar News
Nagesh patil Ashtikar NewsSarakaranma
Published on
Updated on

Shivsena UBT: शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील ६ खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला असून ओम राजेनिंबाळकर यांच्यासह हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनीही ठाकरेंची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केल्याचं निश्चित झालं आहे. यासंदर्भात स्वत: नागेश पाटील आष्टीकर यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे. 'मी दुसरीकडे कुठेही गेलो नाही, शिवसेनेतून शिवसेनेतच गेलोय', असे आष्टीकर यांनी स्पष्ट केलं आहे. सत्तेत असल्याशिवाय कामं होत नव्हती, म्हणूनच मी हा निर्णय घेतल्याचं आष्टीकर यांनी म्हटलं आहे.

Uddhav Thackeray Birthday Wish Nagesh patil Ashtikar News
Operation Tiger : मोठी बातमी : अखेर बंडखोर खासदाराकडूनच 'ऑपरेशन टायगर'वर शिक्कामोर्तब; शिवसेनेत गेल्याचे केलं जाहीर...

"आम्ही १८ जूनपर्यंत कुठेही गेलो नव्हतो, मात्र शिवसेना वर्धापन दिनाच्या मेळाव्यात आमच्यावर बोचरी टीका करण्यात आली, त्याने आमची मनं दुखावली. पण, खरं सांगायचं तर आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून सत्तेशिवाय कुठलेही कामे होत नाहीत. मी जे काही पाऊल उचललं, ते लोकांनी मला ज्या आशेनं खासदार म्हणून निवडून दिलंय, ती त्यांची कामे पूर्ण करायची म्हणून. सत्तेत असल्याशिवाय लोकांची ही कामे होत नव्हती. अनेकांना माझी भूमिका पटली नसेल, काहींना पटलीही असेल. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे, मला तुमच्याकडे सालानं ठेवा, मी तुमचं साल नेकीनं करेन. माझ्यावर तुम्ही जी जबाबदारी ठेवलीय, ती जबाबदारी निश्चितपणे पार पाडेन", असे नागेश पाटील आष्टीकर यांनी म्हटले.

'शिवसेनेतून शिवसेनेतच गेलोय'

"मी माझ्या कामातून नाराज कार्यकर्त्यांना दाखवून देईल, मी दुसरं कुठंही गेलो नाही, शिवसेनेतुन शिवसेनेतच गेलोय, मी विचारधारा सोडलेली नाही, कृपया कुणीही असंविधानिक बोलू नका, राग व्यक्त करा पण असंविधानिकपणे नको, शब्द मनाला खूप लागतात. कारण, आपल्याच गावच्या बाभळी आणि आपल्याच गावच्या बोरी.." असे म्हणत त्यांनी नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी केली.

Uddhav Thackeray Birthday Wish Nagesh patil Ashtikar News
Krishna Ashtikar: वडिलांनी बंडखोरी केल्यानंतर कृष्णा आष्टीकरांचं विधानपरिषद निवडणुकीबाबत मोठं विधान; म्हणाले, रिंगणात...

संजय राऊतांना गर्भित इशारा

"संजय राऊत म्हणाले की, झोडून काढा, हरकत नाही ते माझ्या वडिलांसारखे आहेत, त्यांनी बोलायला हरकत नाही. मात्र, झोडून काढू म्हटले तरी कोणीही कोणाला कमी नसतं, त्याचे परिणाम वाईट होतात", असे म्हणत त्यांनी संजय राऊतांना गर्भित इशारा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com