Nagpur Graduates Constituency Result: नागपुरात भाजपचा 'गेम' कोणी केला? हक्काचे मतदानच अवैध ठरल्याने हातातोंडाशी आलेला विजय हुकला; 'त्या' मतपत्रिकेवरील क्रमांक पाहताच अधिकारीही चक्रावले!

Abhijit Vanjari wins News : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत झालेल्या एकूण 1 लाख 65 हजार 541 मतदानापैकी तब्बल 15 हजार 106 मतदान अवैध ठरले. पदवीधरांच्या निवडणुकीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध झालेले मतदान लक्षवेधी ठरले आहे.
Abhijeet Vanjari Sudhakar Kohale
Abhijeet Vanjari Sudhakar Kohale Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Nagpur News : नागपूर पदवीधर मतदारसंघातील निवडणूक शेवटच्या फेरीपर्यंत उत्कंठावर्धक ठरली. जवळपास 45 तासापेक्षा अधिककाळ चाललेल्या या मतमोजणीत सुरुवातीला काँग्रेसकडे आघाडी होती तर मध्यतंरी भाजपकडे आघाडी कायम राहिली. त्यामुळे भाजप गड राखणार अशी चर्चा सुरु झाली. मात्र विजयासाठी 75 हजार 438 मताचा कोटा ठरला होता. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या नितेश कराळे यांच्या 24 हजार 249 मतामधील दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झाली. कराळे गुरुजींची दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यासाठी घेतली अन् त्याच ठिकाणी गेम पालटला. त्यांची 15 हजार मते मोजताच मागे असलेले काँग्रेस आमदार अभिजित वंजारी अडीच हजार मताने पुढे आले अन् शेवटी राहिलेल्या दहा हजार मतांमध्ये आघाडी कायम ठेवत वंजारी यांनी तीन हजार पक्ष अधिक मताने विजय खेचुन आणला.

विशेष म्हणजे भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या नावासमोर 2 आकडा लिहिल्याने सुमारे तीन हजार मते अवैध ठरली. त्यांच्या नावापुढे एक नंबर लिहला असता तर निकाल वेगळाच लागला असता. भाजपच्या हक्काचे हे मतदानच अवैध ठरल्याने हातातोंडाशी आलेला त्यांचा विजय हुकला. 'त्या' मतपत्रिकेवरील एक ऐवजी दोन क्रमांक पाहून मतमोजणी केंद्रातील अधिकारीदेखील चक्रावले होते.

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत झालेल्या एकूण 1 लाख 65 हजार 541 मतदानापैकी तब्बल 15 हजार 106 मतदान अवैध ठरले. पदवीधरांच्या निवडणुकीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध झालेले मतदान लक्षवेधी ठरले आहे. या निवडणुकीतील विशेष बाब म्हणजे भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या नावासमोर अनेक मतदारांनी मतपत्रिकेवर केवळ 2 आकडा लिहिल्याने कोहळे यांना मिळू शकणारे हक्काचे मतदान अवैध ठरले. हे मतदान कोहळे यांना मिळाले असते तर त्यांची आघाडी वाढली असती.

'त्या' अजब पॅटर्नची रंगली चर्चा

मतमोजणीवेळी काही मतपत्रिकांवर सुधाकर कोहळे यांच्या नावासमोर 2 आकडा लिहिल्याने सुमारे तीन हजार मते अवैध ठरली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदारांनी कोहळे यांच्या नावासमोर 1 आकडा न लिहिता 2 आकडा लिहिल्याने फक्त कोहळे यांना मिळू शकणारी जास्तीची आघाडीच कमी झालेली नाही, तर विशिष्ट मतदारांच्या गटाने ही ठरवून केलेली कृती तर नाही ना, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. 'त्या' अवैध ठरलेल्या मतपत्रिकाची संख्या मोठी असल्याने सर्वचजण चक्रावून गेले होते. त्यामुळे या अजब पॅटर्नची चांगलीच चर्चा या मतदान केंद्रावर रंगली होती.

Abhijeet Vanjari Sudhakar Kohale
RSS च्या बालेकिल्लात BJP चा पराभव करून काँग्रेसवरील ‘शून्याचा टॅग’ हटवणारे अभिजित वंजारी कोण?

मतमोजणीवेळी नेमके काय घडले?

नागपूर पदवीधर मतदारसंघातील मतमोजणीच्या दोन फेरीनंतर 1 लाख 50 हजार 874 मते ही वैध ठरल्यामुळे नियमाप्रमाणे 75 हजार 438 मताचा विजयाचा कोटा ठरला होता. दोन फेरीनंतर पहिल्या पसंतीच्या मतदानात विजयाचा कोटा कोणालाच गाठता आला नाही. त्यामुळे दुसऱ्या पसंती क्रमाचे मते मोजण्यात आली. पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीचे मते मिळून सुधाकर कोहळे यांना 60 हजार 945 तर काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांना 56 हजार 665 मते मिळाली. त्यानंतर 16 उमेदवार बाद करूनही कोटा गाठता आलं नाही. मात्र, त्यामध्ये अभिजीत वंजारी हे सुधाकर कोहळे यांच्या पेक्षा काही अंशी जास्त मतदान घेऊन ही कोहळे यांची एकूण आघाडी फारशी कमी करू शकले नव्हते. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर असलेले नितेश कराळे यांच्या मतांमधील दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करावी लागली.

Abhijeet Vanjari Sudhakar Kohale
युद्ध आणखी पेटलं! इराणच्या तेहरानमधील इंधन साठ्यांवर भयानक हल्ले; इस्त्रायलच्या IDF ने शेअर केले कारवाईचे PHOTO

थोड्यावेळानंतर नितेश कराळे यांच्या 24 हजार 249 मतामध्ये दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली. कराळे गुरुजींची दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यासाठी घेतली अन त्याच ठिकाणी गेम पालटला. त्यांची १५ हजार मते मोजताच मागे असलेले काँग्रेस आमदार अभिजित वंजारी अडीच हजार मताने पुढे आले अन शेवटी राहिलेल्या दहा हजार मतांमध्ये आघाडी कायम ठेवत वंजारी यांनी तीन हजार पक्ष अधिक मताने विजय खेचुन आणला.

Abhijeet Vanjari Sudhakar Kohale
Devendra Fadnavis PM Race : देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या दिशेने 'सुसाट', ‘अपघात’ घडू न देण्याचे आव्हान!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com