Eknath Shinde ShivSena: शिवसेनेच्या 'त्या' मंत्र्यांना डच्चू मिळणार; एकनाथ शिंदेंच्या विश्वासू आमदाराच्या विधानाने अनेकांचे धाबे दणाणले!

Shivsena Minister News : भंडाऱ्यामध्ये शिवसेनेच्या वतीने नागपूर पदवीधर मतदारसंघातील उमेदवारासाठी प्रचार सभा घेण्यात आली. या सभेला भाजपाचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते.
Shiv Sena Eknath Shinde
Shiv Sena Eknath ShindeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : राज्यातील विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी 23 ऑक्टोबरला निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहचला आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यातील पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर तीन पदवीधर तर पुणे व अमरावती या दोन शिक्षक मतदारसंंघाचा समावेश आहे. या मतदारसंघामध्ये महायुतीमध्येच मोठी बंडखोरी झाली आहे. यावरून महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यातच भंडाऱ्यामध्ये शिवसेनेच्या वतीने नागपूर पदवीधर मतदारसंघातील उमेदवारासाठी प्रचार सभा घेण्यात आली. यावेळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदाराच्या विधानाने राज्य मंत्रीमंडळातील मंत्र्यांचे धाबे दणाणले आहेत. परफॉर्मन्स नसलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असून त्या जागी इतर आमदारांना संधी मिळणार असल्याचे सांगत बॉम्बच टाकला आहे.

भंडाऱ्यामध्ये शिवसेनेच्या वतीने नागपूर पदवीधर मतदारसंघातील उमेदवारासाठी प्रचार सभा घेण्यात आली. या सभेला भाजपाचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते. शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची देखील उपस्थिती होती. यावेळी त्यांनी परफॉर्मन्स नसलेल्या शिवसेनेच्या (Shivsena) मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे, असे संकेत यावेळी भोंडेकर यांनी दिले आहेत.

दरम्यान, यावेळी परफॉर्मन्स नसलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांना डच्चू मिळणार यावर बोलताना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मोठे संकेत दिले आहेत. एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांचा मंत्रिपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे येत्या काळात परफॉर्मन्स पाहून काही रिप्लेस होणारच आहेत, त्यामुळं तोंडांत साखर पडणार, असे संकेत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिले आहेत, त्यामुळे आता कोणत्या मंत्र्यांना डच्चू मिळणार? यावरून चर्चेला उधाण आले आहे.

Shiv Sena Eknath Shinde
Bacchu Kadu Setback : बच्चू कडूंना मोठा धक्का! कोर्टाने अध्यक्षपदावर राहण्याचा दावा फेटाळला

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसापूर्वीच शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज असल्याने बैठक घेतली होती. या बैठकीत शिंदे यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली होती. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना कामकाजात सुधारणा करण्याची तंबी दिली होती. जनतेची कामे, मतदारसंघातील प्रश्न आणि पक्षसंघटनेच्या वाढीकडे लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले होते. यापूर्वीही कामगिरी सुधारली नाही तर मंत्रिपद गमवावं लागू शकते, असा इशारा शिंदेंनी दिला होता. त्यामुळे येत्या काळात एकनाथ शिंदे परफॉर्मन्स नसलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांना डच्चू देऊ शकतात, अशी चर्चा रंगली आहे.

Shiv Sena Eknath Shinde
Uddhav Thackeray Setback : ज्याची भीती तेच घडलं! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, एकनाथ शिंदेंच्या मंत्रालयाने अधिसूचना काढली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com