Shivraj Motegaonkar NEET case : NEET पेपरफुटीत महाराष्ट्र ठरतोय ‘हब’! मोटेगावकर क्लासचे विद्यार्थी 'CBI'च्या रडारवर, कोट्यवधींच्या व्यवहारांच्या चौकशीसाठी 'ED'ची एन्ट्री ठरली!

Maharashtra emerges major hub NEET-UG paper leak case CBI and ED intensify raids, probe suspicious financial transactions and coaching class links across multiple cities. : नीट पेपरफुटी प्रकणात लातूरच्या RCC कोचिंग क्लासच्या संचालकाच्या खात्यात संशयास्पद कोट्यवधींचे व्यवहार होत असून, CBI तपास वेग घेत, नागपूर आणि चंद्रपूर इथं संशयित विद्यार्थ्यांच्या घरावर छापे घातले.
Shivraj Motegaonkar NEET case
Shivraj Motegaonkar NEET caseSarkarnama
Published on
Updated on

NEET-UG Paper Leak : देशभर गाजत असलेल्या NEET-UG पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र हे मोठे केंद्र बनल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. लातूर, नांदेड, नाशिक, पुणे, नागपूर आणि चंद्रपूरपर्यंत या रॅकेटचे धागेदोरे पोहोचल्याची माहिती तपास यंत्रणांकडून समोर येत आहे.

आर्थिक व्यवहारांचे मोठे नेटवर्क उघड होत असल्याने आता हे प्रकरण केवळ पेपरफुटीपुरते मर्यादित न राहता आर्थिक गैरव्यवहारांच्या चौकशीपर्यंत पोहोचले असून, अंमलबजावणी संचालनालय (ED) देखील सतर्क झाले आहे.

दरम्यान, लातूरमधील RCC कोचिंग क्लासचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर याच्या बँक खात्यांमध्ये कोट्यवधींचे संशयास्पद व्यवहार आढळल्याने तपास अधिकच वेगाने सुरू झाला आहे. हे व्यवहार संशयित विद्यार्थ्यांच्या (Student) पालकांकडून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, या प्रकरणामागे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता तपास यंत्रणांनी वर्तवली आहे. या संपूर्ण नेटवर्कमध्ये काही प्रभावशाली व्यक्तींचाही सहभाग असू शकतो, या दिशेने CBI तपास करत आहे.

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये (Nagpur) दिल्लीहून आलेल्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CBI) पथकाने गणेशपेठ आणि कोतवाली पोलीस हद्दीतील काही विद्यार्थ्यांच्या घरांवर झाडाझडती घेतली. संबंधित विद्यार्थ्यांचे पालक आणि कुटुंबीयांचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Shivraj Motegaonkar NEET case
Shivraj Motegaonkar arrest : छोट्या खोलीतील ‘आरसीसी’ ते सीबीआय धाड! मोटेगावकरांचा प्रवास अखेर नीट पेपरफुटीत अडकला

तपासात हे विद्यार्थी लातूरमधील प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या कोचिंग क्लासमध्ये शिकत असल्याचे समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या विद्यार्थ्यांनी पेपर खरेदी केल्याचा संशय CBI ला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोबाईल, आर्थिक व्यवहार आणि संपर्कांचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे.

Shivraj Motegaonkar NEET case
Rahuri NEET Paper Leak : NEET पेपरफुटी प्रकरणात राहुरी लिंक; CBIच्या धाडसी कारवाईने राज्यात खळबळ

परीक्षा होण्याच्या 42 तास आधी पेपर?

देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाची मानली जाणारी NEET परीक्षा 3 मे रोजी पार पडली. मात्र, परीक्षेच्या तब्बल 42 तास आधी काही कोचिंग क्लास संचालकांकडे प्रश्नपत्रिका पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर केंद्र सरकारने या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी CBI कडे सोपवली.

Shivraj Motegaonkar NEET case
SRPF Exam Cancelled: NEETनंतर महाराष्ट्रात आणखी एक परीक्षा रद्द; SRPF भरतीतील 85 प्रश्न एकाच पुस्तकामधून

पाच राज्यांत छापासत्र

CBI ने आतापर्यंत पाच राज्यांमध्ये मोठे छापासत्र राबवत अनेक कोचिंग क्लास संचालक, प्रवेश निश्चित करणाऱ्या एजन्सी आणि पेपर खरेदी केल्याचा संशय असलेल्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्रातील काही खासगी एजन्सी आणि ‘मेडिकल अॅडमिशन नेटवर्क’ देखील तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याची माहिती आहे.

Shivraj Motegaonkar NEET case
Maharashtra Government Employees News: राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! DA थकबाकी मेच्या पगारासोबत मिळणार

नागपुरातील एजन्सीही रडारवर

नागपूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन देणाऱ्या काही एजन्सींवरही CBI ची नजर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या एजन्सींचे आर्थिक व्यवहार, विद्यार्थ्यांशी झालेले संपर्क आणि बाहेरील राज्यांशी असलेले संबंध तपासले जात आहेत.

चंद्रपूरपर्यंत पोहोचले धागेदोरे

दरम्यान, या प्रकरणाचे धागेदोरे आता चंद्रपूर जिल्ह्यापर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. ब्रह्मपुरी येथील एका विद्यार्थ्याच्या घरावर CBI ने छापा टाकल्याची माहिती आहे. हा विद्यार्थीही लातूरमध्ये प्रा. मोटेगावकर यांच्या कोचिंगमध्ये शिकत असल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, आगामी काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com