Omraje Nimbalkar : पवनराजे हत्या प्रकरणाच्या निकालानंतर मध्यरात्री उद्धव ठाकरेंचा ओमराजेंना फोन; चर्चेदरम्यान म्हणाले, "तुम्हीच मला..."

Omraje Nimbalkar and Uddhav Thackeray : 'ऑपरेशन टायगर'मध्ये ज्या सहा खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याच्या बातम्या समोर येत होत्या. त्यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा देखील समावेश होता. ओमराजे निंबाळकरांचा हा निर्णय त्यांच्या समर्थकांना पटला नसल्याने त्यांच्याविरोधात सोशल मीडियावर रोष व्यक्त केला जात होता.
MP Omraje Nimbalkar, Uddhav Thackeray
MP Omraje Nimbalkar during a crucial political phase as speculation grows over his future amid the Operation Tiger controversy and Shiv Sena developments.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 21 Jun : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'ऑपरेशन टायगर'च्या माध्यमातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फोडल्याच्या बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र, आता हे ऑपरेशन रेंगाळलं असून ते यशस्वी होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कारण या 'ऑपरेशन टायगर'मध्ये ज्या सहा खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याच्या बातम्या समोर येत होत्या. त्यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा देखील समावेश होता. ओमराजे निंबाळकरांचा हा निर्णय त्यांच्या समर्थकांना पटला नसल्याने त्यांच्याविरोधात सोशल मीडियावर रोष व्यक्त केला जात होता.

अशातच काल त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर हत्येच्या खटल्याचा कोर्टाचा निकाल निंबाळकर यांच्या विरोधात गेल्याने आता ते शिदेंच्या शिवसेनेत जाणार की नाही? असा संभ्रम निर्माण झाला आहे. कारण खासदार संजय राऊतांनी ओमराजे त्यांच्या वडिलांच्या हत्येच्या खटल्याचा मनासारखा निकाल लागावा यासाठी शिंदेंकडे त्यांनी यावं असा त्यांच्यावर दबाव असल्याचा दावा केला होता.

मात्र, आता निकालच विरोधात गेल्यामुळे ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का बसला असून ते आता आगामी राजकीय भूमिका काय घेणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अशातच काल मध्यरात्री ठाकरेंच्या शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी केल्याचं समोर आलं आहे.

MP Omraje Nimbalkar, Uddhav Thackeray
Hormuz Strait Tensions : संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलं! इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्याची घोषणा

शनिवारी मध्यरात्री खासदार कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांनी ओमराजे यांच्या पुण्यातील घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी या नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली शिवाय याचवेळी पाटील आणि सरदेसाई यांनी उद्धव ठाकरे आणि ओमराजे निंबाळकरांचं फोनवरुन बोलणं करून दिल्याची माहिती समोर आली आहे.

यावेळी ठाकरेंनी ओमराजेंचं नेमकं म्हणणं काय आहे हे समजून घेतलं. तर याचवेळी फोनवरून ओमराजेंनी आपण अद्याप ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच असल्याचं सांगितलं. शिवाय आपणच मला मोठं केलं, आज मी खासदार आहे ते पक्षामुळे, तुमच्यामुळे. त्यामुळे मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही. मी कार्यकर्त्यांसोबत सगळ्या बाबतीत चर्चा करणार आहे, असं ओमराजे ठाकरेंना फोनवरूव बोलल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

MP Omraje Nimbalkar, Uddhav Thackeray
PMC : नगरसेवकांपासून 25 हजारांवर पगार असणाऱ्या अधिकाऱ्यांची पुणे महापालिकेकडे सरकारने मागितली माहिती

दरम्यान, वडिलांच्या हत्या प्रकरणाच्या निकालानंतर त्यांना खासदार संजय राऊत आणि इतर ठाकरेंच्या इतर नेत्यांनी केलेल्या टीकेमुळे ओमराजे नाराज झाले होते. त्यांच्यासह त्यांच्या घराण्यावर केलेल्या टीकेमुळे ओमराजेंना प्रचंड त्रास झाला. त्यानतरही ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते ओमराजेंच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी आपण अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता ओमराजे नेमकी काय राजकीय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com