Operation Tiger First Photo : 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! शिंदेंच्या राष्ट्रीय नेत्यासोबत गुप्त ठिकाणी झाली फुटीर खासदारांची बैठक

Operation Tiger unseen first photo : ऑपरेशन टायगरमधील फुटीर खासदारांचा पहिला फोटो समोर आला आहे. शिंदे गटाच्या राष्ट्रीय नेत्यासोबत झालेल्या गुप्त बैठकीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
Operation Tiger First Photo
Operation Tiger First Photo Sarkarnama
Published on
Updated on

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’बाबत शिंदेंच्या राष्ट्रीय नेत्यासोबत गुप्त ठिकाणी झालेल्या बैठकीतील संपूर्ण घडामोडींशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येणारा पहिला फोटो आता समोर आला आहे. या फोटोमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या छायाचित्रामुळे पडद्यामागे सुरू असलेल्या हालचालींना अधिक वेग आला असून विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

समोर आलेल्या फोटोमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदार एकत्र दिसत आहेत. यामध्ये हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळचे खासदार संजय देशमुख तसेच ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे एकत्र दिसत आहेत. विशेष म्हणजे, या बैठकीत शिवसेनेचे राष्ट्रीय समन्वयक अभिषेक वर्मा यांचीही उपस्थिती असल्याचे फोटोवरून स्पष्ट होत आहे.

Operation Tiger First Photo
NEET Exam Controversy : पेपरफुटीनंतर NTA चा नवा प्रताप; अजब कारभाराची मालिका सुरूच! विद्यार्थी नागपूरचा, अन् परीक्षा केंद्र थेट अबुधाबीत

सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीतील प्रसिद्ध लीला पॅलेस हॉटेलमध्ये ही गुप्त बैठक पार पडली होती. या बैठकीत आगामी राजकीय रणनीती, पक्षातील बदलत्या समीकरणांबाबत चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक महिन्यांपासून या संपूर्ण मोहिमेची तयारी सुरू होती, अशी माहितीही राजकीय सूत्रांकडून मिळत आहे.

राजकीय वर्तुळात अशी चर्चा रंगली आहे की, खासदार श्रीकांत शिंदे आणि अभिषेक वर्मा यांच्या नियोजनातून ‘ऑपरेशन टायगर’ची अंमलबजावणी करण्यात आली. यासाठी पडद्यामागे मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू असल्याचेही बोलले जात आहे.

दरम्यान, या बैठकीचा फोटो सार्वजनिक झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. संबंधित खासदारांच्या भूमिकेबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Operation Tiger First Photo
Pavanraje Nimbalkar murder case : पवनराजे निंबाळकर हत्याकांड: 20 वर्षांनंतर अंतिम निकाल लागणार; माजी गृहमंत्र्यांसह 9 आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश!

फोटो समोर आल्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची शक्यता निर्माण झाली असून, या बैठकीमागील नेमका उद्देश काय होता याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडवून आणणाऱ्या या घडामोडींची चर्चा सध्या राज्यभर रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com