Chandrashekhar Bawankule : संजय राऊतांचा गंभीर आरोप, एकनाथ शिंदेंच्या मदतीला बावनकुळे धावले, म्हणाले...

Sanjay Raut Allegation news : संजय राऊत यांनी कितीही खडे टाकले तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला.
Chandrashekhar Bawankule Sanjay Raut
Chandrashekhar Bawankule Sanjay Raut sarkarnama
Published on
Updated on

karad News : महायुती सरकारच्या कारभारावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत कोंडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील घोटाळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाहेर काढणार असतील तर स्वागतच आहे, असे वक्तव्य करीत खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. त्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांनी कोणताही घोटाळा केलेला नाही. महायुती भक्कम आहे. त्यांना राज्यातील जनता ऐकत नाही आणि आम्हीही त्यांना ऐकत नाही. आमचे सरकार पारदर्शी, गतीमान असून प्रचंड ताकदीने चालणार असून पुढील 15 वर्षे सरकार महायुतीचेच असेल. त्यामुळे संजय राऊत यांनी कितीही खडे टाकले तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला.

Chandrashekhar Bawankule Sanjay Raut
Shivsena News : 'फिक्सरां'च्या नथीतून मुख्यमंत्र्यांनी सोडलेला 'बाण' तानाजी सावंत, शिवसेनेच्या जिव्हारी!

एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील घोटाळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बाहेर काढणार असतील तर स्वागतच आहे, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांचे त्याबद्दल अभिनंदन केले. त्या प्रश्नावर मंत्री बावनकुळे बोलत होते.

Chandrashekhar Bawankule Sanjay Raut
Uddhav thackeray : 'आता उद्धव ठाकरेंना उद्ध्वस्त करणार'; शिवसेनेच्या बड्या नेत्याचा इशारा

एकनाथ शिंदे यांनी कोणताही घोटाळा केलेला नाही. आमचे महायुतीचे सरकार हे पारदर्शी, गतीमान सरकार आहे. संजय राऊत यांनी विरोधी पक्षात चांगले काम करावे. चांगल्या भूमिका आमच्या सरकारला सांगाव्यात. संजय राऊत यांना राज्यातील जनता ऐकत नाही, आम्हीही त्यांचे ऐकत नाही. आमचे सरकार पारदर्शी, गतीमान असून मोठ्या ताकदीने चालणार असून पुढील 15 वर्षे महायुतीचेच सरकार असेल. त्यामुळे संजय राऊत यांनी कितीही खडे टाकले तर त्याचा उपयोग होणार नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Chandrashekhar Bawankule Sanjay Raut
Munde, Kokate Resignation : अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार; मुंडे, कोकाटेंच्या राजीनाम्यावरून विरोधक महायुतीला घाम फोडणार !

शॅडो कॅबिनेटचा उपयोग होणार नाही

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसने शॅडो कॅबिनेटची स्थापना केली. राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या कामकाजाचं मूल्यमापन करण्यासाठी शरद पवारांनी नेत्यांची टीम तयार केली आहे, त्या प्रश्नावर महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, 'शॅडो कॅबिनेटची स्थापना केली. त्याऐवजी उध्दव ठाकरे यांच्या काळातील शॅडो कॅबिनेटचा अभ्यास करावा लागेल. आमचे सरकार पारदर्शी काम करत असल्याने कितीही शॅडो कॅबिनेट तयार केले तरीही काहीही उपयोग होणार नाही.

Chandrashekhar Bawankule Sanjay Raut
Sharad Pawar NCP: शरद पवार पुन्हा मैदानात; फडणवीस सरकारला आपली ताकद दाखवणार; घेतला 'हा' मोठा निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com