Ajit Pawar News : 'बिना संघर्ष 'पार्थ' च्या खासदारकीची स्वप्न पाहणाऱ्या बापाने...'; अजितदादांवर बोचरी टीका!

Sharad Pawar Vs Ajit Pawar : "अजित पवार यांनी महायुतीतून बारामतीवर दावा केला आहे..."
Sharad Pawar Vs Ajit Pawar
Sharad Pawar Vs Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) मुंबईजवळील कर्जत या ठिकाणी दोनदिवसीय शिबिर नुकतेच पार पडले. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षांसंदर्भात अनेक गोष्टींचा खुलासा केला, काही गौप्यस्फोटही केले. लोकसभा निवडणुकीसाठी आपली रणनीतीही स्पष्ट केली. बारामतीसह सातारा, रायगड, शिरूर या लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे आता शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार गट असा सामना बारामतीत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Latest Marathi News)

Sharad Pawar Vs Ajit Pawar
Baban Shinde : अजित पवार गटाच्या आमदार पुत्राला सहा महिन्यांची शिक्षा...

यामुळे आता अजित पवार गटाकडून बारामतीचा उमेदवार कोण असणार? याबाबत चर्चा होत आहे. अजित पवारांनी बारामतीवर दावा केल्यानंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार किंवा त्यांचे मुलगे पार्थ पवार यांच्यापैकीच लोकसभेला बारामतीतून उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

दरम्यान, यावरून आता अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात वाद-विवाद आणि आरोप-प्रत्यारोप होत आहेत. शरद पवार गटाचे सोलापूरमधील नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर टीका केली आहे.

प्रशांत बाबर आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, "बिना संघर्ष करता घरात बसलेल्या 'पार्थला' खासदार करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बापानं, 38 वर्षीच्या युवा नेतृत्वाने महाराष्ट्राच्या युवा वर्गासाठी काढलेल्या संघर्ष यात्रेवर टीका करू नये," अशा शब्दांत बाबर यांनी अजित पवारांवर घणाघाती टीका केली आहे.

Sharad Pawar Vs Ajit Pawar
Washim News : ‘युवा संघर्ष’च्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात नवचैतन्याची लहर

अजित पवारांनी केली होती टीका -

अजित पवारांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांवर अप्रत्यक्षपणे नाव न घेता टीका केली होती. रोहित पवारांनी युवा वर्गासाठी काढलेल्या युवा संघर्ष यात्रेवरही अप्रत्यक्ष भाष्य केले होते. यामुळे दोन्ही गटांत टीका टिप्पणी केली होती.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com