Devendra Fadnavis: अलमट्टीची उंची वाढवण्याला महाराष्ट्र सरकारचा विरोध, मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्ट संकेत

Almatti dam height controversy News : कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाविरोधात प्रसंगी कोर्टात जाण्याची तयारी ठेवली आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
CM Devendra Fadnavis
CM Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या विरोधात महाराष्ट्र सरकारने हरकत घेतली आहे. कर्नाटक सरकारच्या निर्णयाविरोधात प्रसंगी कोर्टात जाण्याची तयारी ठेवली आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला पुराचा धोका अधिक होऊ देणार नाही. अलमट्टीची उंची वाढवण्याला महाराष्ट्र सरकारचा विरोध राहील, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. याबाबत महाराष्ट्र सरकारने समिती नेमली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले

कोल्हापूर येथील कार्यक्रमावेळी ते बोलत होते. सर्वाधिक समाजकार्य करणारा समाज हा देखील जैन समाज आहे. जग वेगवेगळ्या नावाने का असेना पण आपलेच विचार मांडत आहेत, त्यानुसार जगत आहेत. त्याच क्रेडिट कदाचित आपल्याला ते देणार नाहीत. संस्कारी पिढी उभा करण्याचे काम आपली संस्कृती करत आहे. नांदनी येथील मठाला आपण अ दर्जा देऊ. आपली धर्मसत्ता कधी राजसत्तेवर उभा राहिला नाही. पण राजसत्तेचं कर्तव्य आहे की धर्मसत्तेच्या सोबत रहावे, जेणेकरून आपली राजसत्ता देखील संस्कारी बनेल, महायुतीच्या सरकारने जैन महामंडळ स्थापन केले आहे. याबाबत आम्ही निर्णय घेऊन हे महामंडळ बळकट करू, असे मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी स्पष्ट केले.

CM Devendra Fadnavis
Santosh Deshmukh Murder Case : सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात भिवंडी कनेक्शन; सीआयडी व तपास पथकांकडून दोघांकडे चौकशी

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची यंत्रणा राज्यातील सर्व आरोग्य विभागाशी चर्चा करणार आहे. त्याबाबतच्या उपाययोजनाबाबत चर्चा करणार आहे. कपो कल्पित माहितींवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितींवर विश्वास ठेवा. अधिकृत माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल असा आमचा प्रयत्न आहे. सॊमवारी आरोग्य विभागाची बैठक झाली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाबाबत राज्याच्या आरोग्य विभागाची बैठक ऑनलाईन सुरू असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

CM Devendra Fadnavis
Beed Santosh Deshmukh Case : जरांगेना बेड्या ठोका, धसांचा राजीनामा घ्या; ओबीसी नेते आक्रमक

शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेल्या पत्रावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणावर निर्धाराने राज्य सरकारने कारवाई केली आहे. कुठेही आम्ही मागे हटलो नाही हटणार नाही. दोषींना सोडणार नाही आणि धमक्या देणाऱ्यांना ही सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले.

CM Devendra Fadnavis
BJP Politics : भाजपच प्रदेशाध्यक्ष बदलणार, पण केव्हा? मंत्री बावनकुळेंनी सांगितली निवड प्रक्रिया...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com