

Sangali News : सांगली बाजार समितीत निवडणुकीत आता वेगळे वळण आले आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपमध्ये असा थेट दोघांमध्ये ही निवडणुकीत होणार अशी चर्चा असताना, या निवडणुकीत आता दोन्ही पाटलांची मनोमिलन झाल्याचे दिसून येत आहे. तसेच, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नेत्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत चर्चेची खलबतं सुरू होती, अशी चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील (Vishal Patil) यांची अखेर दिलजमाई घडून आली आहे. आघाडीतील संघर्ष आता संपल्याचे दिसून येते. यामुळे आता एकत्रित येत भाजपला तडाखा देण्यासाठी दोन्हा पाटील एकत्रित आले आहेत.
बाजार समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात जयंत पाटील सक्रियपणे हालचाली करत असल्याचे दिसले. या उपस्थितीत रात्री उशिरापर्यंत बैठक पार पडले. या बैठकीवेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, मोहनराव शिंदे कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत, जितेश कदम उपस्थित होते. महाविकास आघाडीने एकत्रितपणे या निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता महाविकास आघाडी आणि भाजप असाच सामना होण्याचे चिन्हे दिसत आहे.
दुरंगी लढतीची शक्यता-
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटचा दिवस होता. यामुळे वेगवेगळ्या वेगवान घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी जयंत पाटील आणि विशाल पाटील मतभेद निर्माण झाल्याचे चित्र दिसत होते. विशाल पाटील हे वसंतदादा सहकार पॅनलच्या वतीने निवडणुकीत उतरणार असल्याचे जाहीर केले होते. यासाठी त्यांनी सर्वपक्षीयांना आमंत्रण दिले होते.
मात्र, दुसरीकडे जयंत पाटीलही महाविकास आघाडीच्या बैठका घेत होते. आज अखेर जयंत पाटील यांच्या बैठकीत विशाल पाटीलांनी हजेरी आघाडीच्या माध्यमातून एकत्र निवडणूक लढवण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
जागा वाटपाचा अडचण दूर होणार?
काँग्रेसकडून नऊ, राष्ट्रवादीआठ जागा लढवणार अशी चर्चा होती. या ठिकाणी महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट व तसेच घोरपडे गटाला देखील, काही जागा देण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.