Shahajibapu : 50 वर्षांची सत्ता जाताच शहाजीबापूंनी डागली शेकापवर तोफ; ‘त्यावेळी दुसरीकडं तोंड करायचो, एवढा भारी कारभार..’

Panchayat Samiti Sabhapati Election : माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला पंचायत समितीच्या कारभारावर टीका करत शेतकरी कामगार पक्षावर निशाणा साधला. पंचायत समितीचा कारभार इतका वाईट असल्याचे त्यांनी वक्तव्यात म्हटले.
Shahajibapu Patil
Shahajibapu PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 15 March : सांगोला पंचायत समितीचा कारभार आजपर्यंत कसा झाला, हे दीपक साळुंखेंना थोडा माहिती आहे. मला काहीच माहिती नाही. पंचायत समितीच्या इमारतीजवळ माझी गाडी आली की, मी दुसरीकडं तोंड करतो. त्या पंचायत समितीचा बोर्ड वाचायचीसुद्धा आयुष्यात कधी भावना झाली नाही. कारण एवढा भारी कारभार त्या ठिकाणी झालेला आहे, अशा शब्दांत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कारभारावर टीकास्त्र सोडले.

सांगोला पंचायत समितीच्या (Sangola Panchayat Samiti) सभापतिपदी भाजपच्या पूनम इंगवले, तर उपसभापतिपदी शिवसेनेचे अजय सरगर यांची निवड झाली आहे. सांगोला पंचायत समितीमधील शेतकरी कामगार पक्षाची ५० वर्षांची सत्ता गेली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभात बोलताना शहाजीबापूंनी शेकापवर तोफ डागली.

माजी आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) म्हणाले, सांगोला पंचायत समिती आणि संभाजीराव शेंडे हे एक अतूट समीकरण होतं. सभापतिपदाच्या माध्यमातून त्यांनी सांगोल्यात काँग्रेस जीवंत ठेवण्याचे काम केले आहे. त्यांचे सहकारी म्हणून उपसभापती म्हणून माजी आमदार काकासाहेब साळुंखे यांनी काम केले होते. आमच्या घरातही सदस्यपद कायम होते.

संभाजीराव शेंडेंचे सभापतिपद काही राजकीय उलाढालीत गेलं. मला आणि दीपक साळुंखेंन आज अभिमान आहे की, ज्या गावचं सभातिपद गेलं होतं, त्याच गावात ५० वर्षांनंतर सभापतिपद आम्ही देऊ शकलो, हा भगवंताने दिलेला सर्वांत मोठा आशीर्वाद आहे, असा विश्वास शहाजी पाटील यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सर्व निर्णय समजुतीने घेतले, त्यामुळे आज हा गुलाल आपल्याला उधळायला मिळत आहे. राजकारणात मागं पुढं सरकल्याशिवाय यश मिळत नसतं. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात साडेपाच हजार कोटी रुपयांचा निधी सांगोल्याला दिला होता.

Shahajibapu Patil
Bhagarth Bhalke : भगीरथ भालके गटाचे नव्या राजकीय इनिंगचे संकेत; परिचारकांचा एकेकाळचा समर्थकही सोबतीला

ज्यावेळी महायुतीच्या पक्षामध्ये मतभेद झाले, त्या त्या वेळी सांगोला तालुक्याचे नुकसान झालेले आहे. म्हणून सर्वांनी आपल्या समोर कोण आहे, याचं भान ठेवून निर्णय घेतले पाहिजेत. आपण एकमेकांमध्ये भांडत बसल्याने समोरचा पुढे निघून गेल्याचे आपल्यालाच कळत नाही, अशी खंतही शहाजीबापूंनी बोलून दाखवली.

नव्या पदाधिकाऱ्यांना सूचना

नव्या पदाधिकाऱ्यांनी निर्भरता ठेवली पाहिजे, अशी आपण सर्वांनी अपेक्षा त्यांच्याकडून ठेवली पाहिजे. पंचायत समितीत येणाऱ्या सर्वांत गरीब माणसाचं काम झालं पाहिजे. नंतर पुढाऱ्यांचं काम मार्गी लावलं पाहिजे. त्या दालनाचं पावित्र्य जपा. महायुतीच्या मंत्र्यांच्या मदतीने पाच वर्षांचा कारभार करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Shahajibapu Patil
Sunetra Pawar Satara Tour : सुनेत्रावहिनींचा पवारांच्या बड्या नेत्याला निरोप; साताऱ्यातील नव्या राजकीय घडामोडींचे संकेत

बोराटवाडीत काय ठरलंय?

बोराटवाडीत जे काही ठरलं आहे, त्याची जशाच्या तशी अंमलबजावणी झाल्यानंतरच तालुक्यातील जनतेचा आपल्यावर भविष्यात विश्वास बसेल. कुणाचं तर ऐकून आपण चूक केली तर तालुक्यातील पाच लाख जनतेचा विश्वास तुटत असतो, एवढं लक्षात ठेवा, असे आवाहन माजी आमदार पाटील यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com