Sharad Pawar News : शरद पवार यांचा अजित पवारांना टोला...आज काय म्हणतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही

Sharad Pawar साताऱ्यात शरद पवार यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, शशिकांत शिंदे उपस्थित होते.
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit Pawarsarkarnama
Published on: 
Updated on: 

Sharad Pawar News : अडीच वर्षांच्या पूर्वी ज्यावेळी आम्ही सरकार स्थापन केलं आणि काल ज्यांनी शपथ घेतली. त्यांनी त्या सरकारमध्ये शपथ घेतली होती. त्यावेळी शिवसेनेबद्दलची चिंता कुणाला वाटली नाही. त्यामुळे आज काय म्हणतात याकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही,असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांना लगावला

साताऱ्यात शरद पवार Sharad Pawar यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, शशिकांत शिंदे उपस्थित होते. काल शपथ घेतल्यानंतर अजित पवार Ajit Pawar म्हणाले होते की, जर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर आम्ही भारतीय जनता पक्षासोबत देखील जाऊ शकतो. त्यामुळे तिथे कुठलीही अडचण नाही.

नागालँडमध्ये आम्ही जाऊ शकतो, तर राज्याच्या विकासाकरिता आम्ही जाऊ शकतो.” यावर शरद पवार म्हणाले, “आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो. अडीच वर्ष आम्ही शिवसेनेसोबत काम केले. त्यावेळी आम्हाला कधी वाटलं नाही की, शिवसेनेसोबत जाऊन चूक झाली. आणीबाणी जाहीर झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी आणि माध्यमांनी इंदिरा गांधींवर फार मोठा हल्ला केला होता.

Sharad Pawar, Ajit Pawar
Satara NCP News : कालपर्यंत अजित दादांसोबत असलेले मकरंद पाटील आज पवारसाहेबांच्या गाडीत...

त्या काळात इंदिरा गांधींची भूमिका योग्य आहे, असं म्हणणारा एकच नेता होता, त्यांचं नाव बाळासाहेब ठाकरे आणि पक्षाचं नाव शिवसेना.”त्याच्यानंतर जी निवडणूक झाली. त्यात शिवसेना असा एकच पक्ष होता ज्यांनी एकही उमेदवार उभा केला नव्हता. इंदिरा काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. यापूर्वी आम्ही त्यांच्यासोबत भूमिका घेतली होती. त्यामुळे वेगळं घडतंय असं सांगायचं कारण नाही.

Sharad Pawar, Ajit Pawar
Karad News : अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर...पृथ्वीराज चव्हाण

काहीतरी घडतंय हे आज कळलं, हे अडीच वर्षांच्या पूर्वी ज्यावेळी आम्ही सरकार स्थापन केलं आणि काल ज्यांनी शपथ घेतली. त्यांनी त्या सरकारमध्ये शपथ घेतली होती. त्यावेळी शिवसेनेबद्दलची चिंता कुणाला वाटली नाही. त्यामुळे आज काय म्हणतात याकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही,असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांना खडेबोल सुनावले.

Sharad Pawar, Ajit Pawar
NCP Crisis And Pune : पुणे जिल्ह्यातील भूमिका स्पष्ट न केलेले आमदार आता 'नॉट रिचेबल'

श्री. पवार म्हणाले,“काही मित्रांनी वेगळी भूमिका घेतली. ज्यांनी वेगळी भूमिका घेतली, त्यांनी महाराष्ट्रात मोलाची कामगिरी केली. ते लोक ज्या प्रवृत्तीशी आमचा संघर्ष आहे, त्यांच्याबरोबर गेल्यामुळे नव्या पिढीचा कार्यकर्ता नाउमेद होऊ नये. तो जोमाने उभा राहावा म्हणून हा दौरा सुरू केला आहे.

Sharad Pawar, Ajit Pawar
पक्ष फुटल्यानंतर Sharad Pawar निघाले यशवंतरावांच्या दर्शनाला | Ajit Pawar oth | NCP politics

आम्ही लोकांनी कष्ट केले. या सगळ्यांना तरुणांना योग्य दिशा दिली, कार्यक्रम दिला तर माझी खात्री आहे की, संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीला अनुकूल चित्र दिसेल. याची सुरूवात येथून झाली. काही लोकांनी फोन केले. अनेकांची भूमिका पक्षाची जी भूमिका आहे, त्याशिवाय वेगळी भूमिका घेऊ नये, अशी आहे. ते योग्य वेळी त्याचे निर्णय जाहीर करतील”, असेही श्री. पवार म्हणाले.

Sharad Pawar, Ajit Pawar
हाच तो क्षण जेव्हा Ajit Pawar यांनी घेतली शपथ| NCP | BJP | Maharashtra Political Crisis | Sarkarnama

“काही ठिकाणं मला अशी आहेत की, संघर्ष असेल, काही नवं उभं करायचं असेल, तर मी दोन शहरांची निवड करतो. त्यात एक सातारा आणि दुसरं कोल्हापूर. राष्ट्रवादीतील आमचे अनेक सहकारी ज्यांना आमच्या हजारो कार्यकर्त्यांनी शक्ती दिली. अपेक्षा होती की, हे संघटन त्यांनी मजबूत करावं.

Sharad Pawar, Ajit Pawar
पक्ष फुटल्यानंतर Sharad Pawar निघाले यशवंतरावांच्या दर्शनाला | Ajit Pawar oth | NCP politics

देशात भाजपकडून समाज, धर्म आणि जातींमध्ये वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय. या सगळ्यांशी संघर्ष करून सामाजिक ऐक्य आणि समता यासाठी प्रयत्न करणं ही अपेक्षा सहकाऱ्यांकडून आहे”, असं मत शरद पवार यांनी सांगितलं.

Sharad Pawar, Ajit Pawar
Live : NCP फुटली; Ajit Pawar उपमुख्यमंत्री लंके, कोल्हे, तटकरे, झिरवाळही दादांसोबत | BJP | Shivsena

“महाराष्ट्राच्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पहिल्या दिवसांपासून ज्यांना नेतृत्व दिलं. विधिमंडळात जे पक्षाचं नेतृत्व करतात त्यांचं नाव जयंत पाटील आहे. जयंतराव पक्षाचे अध्यक्ष आहे. विधिमंडळ पक्षाचे नेतेही आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं मला माहिती नाही, पण तो त्यांचा अधिकार आहे”, असं पवारांनी सांगितलं.

Sharad Pawar, Ajit Pawar
Maharashtra Politics : अजितदादांना सत्तेत सहभागी करण्यासाठी भाजपसाठी 'हे' ठरलं मोठं कारण..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.