Satara Politic's : मकरंदआबा, शंभूराज देसाई भाजपला पुन्हा नडणार; झेडपीतील युती ‘स्वीकृत’साठी ठरणार लॉटरी

Nominated Members Selection Issue : सातारा जिल्हा परिषद आणि ११ पंचायत समित्यांमधील स्वीकृत सदस्य निवडीचा मार्ग नऊ महिन्यांनंतर मोकळा झाला आहे. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत सदस्यपदांसाठी लॉबिंगमुळे महायुतीतील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
Makarand Patil-Shambhuraj Desai
Makarand Patil-Shambhuraj DesaiSarkarnama
Published on: 
Updated on: 

Karad, 22 November : सातारा जिल्हा परिषदेसह ११ पंचायत समित्यांमधील स्वीकृत सदस्यांच्या निवडींना अखेर तब्बल नऊ महिन्यांनंतर मुहुर्त मिळाला आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी (ता. २५ नोव्हेंबर) त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पहिली बैठक होणार आहे. पक्षीय बलाबलानुसार भाजपला तीन, राष्ट्रवादी काँग्रेसला दोन व शिवसेनेला एक स्वीकृत सदस्य मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी तीनही पक्षांच्या नेत्यांकडे इच्छुकांनी जोरदार फिल्डींग लावून लॉबिंग सुरु केले आहे.

दरम्यान, यावेळच्या स्वीकृत सदस्यांच्या निवडीला सातारा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपला डावलून घेतलेल्या भूमिकेचीही किनार आहे. त्यामुळे आपल्याच विचारांचे स्वीकृत सदस्य व्हावा, यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात येत आहे. विशेषतः जिल्हा परिषद निवडणूक राष्ट्रवादी आणि शिवसेनेने युती करून लढवली आहे, त्यांनी गटनोंदणी एकत्रित केली असेल तर मंत्री मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई हे भाजपला पुन्हा नडण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वीकृतच्या निवडीत साताऱ्यात महायुती संघर्ष पाहायला मिळू शकतो.

सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक ही महायुती म्हणून न होता प्रत्येक पक्षाने आपली ताकद आजमावण्यासाठी स्वतंत्रपणे लढवली होती. त्यामुळे नेत्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यात जिल्ह्यातील मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांच्यासह सहकारी नेते, आमदार यांनी बाजी मारत ६५ पैकी सर्वाधीक २७ सदस्य निवडून आणले. मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांनी जोरदार फिल्डिंग लावून राष्ट्रवादी काँग्रेसच्या २० जागा निवडूण आणण्यात यश मिळविले.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत प्रत्यक्ष लक्ष घालून पूर्वी पाच असणाऱ्या त्यांच्या पक्षाच्या जागा यावेळी १५ वर नेल्या, तर कॉंग्रेसला मात्र एकाच ठिकाणी यश मिळाले. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अपक्ष असे प्रत्येकी एक सदस्य निवडून आले. सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेकडे संख्याबळ असतानाही भाजपने फोडाफोडी करून सातारा जिल्हा परिषदेची सत्ता हस्तगत केली. त्यादरम्यान झालेला राडा हा राज्यभर गाजला.

Makarand Patil-Shambhuraj Desai
Solapur Dcc Bank : जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांचा गेम कसा झाला? गाफिलपणा भोवला की ‘बटेंगे तो कटेंगे’ चा फॉर्म्युला काम करून गेला?

सत्तास्थापनेदरम्यान झालेल्या राड्यानंतर आता स्वीकृत सदस्यांसाठी २५ नोव्हेंबरला सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीतील गट नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत जिल्हा परिषद आणि ११ पंचायत समितींत प्रत्येक पक्षाच्या सदस्य संख्येनुसार कोटा ठरविण्यात येणार आहे.

या कोट्यानुसार प्रत्येक पक्षाच्या गट नेत्यांना स्वीकृत सदस्यांसाठीचे नामनिर्देशन पत्र दिले जातील. त्यानंतर गटनेत्यांना त्यांच्या पक्षाच्या कोट्यानुसार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुदत दिली जाणार आहे. ज्या पंचायत समितीत दोन्ही पक्षांचे संख्याबळ समान असेल तेथे चिठ्ठीद्वारे कोटा ठरवण्यात येणार आहे.

सरकारकडून निवडीसाठीची कार्यवाही सुरु करण्यात आल्याने इच्छुकांनीही आपल्या नेत्यांकडे जिल्हा परिषद, पंचायत समितीत काम करण्याची संधी मिळावी, यासाठी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. स्वीकृत सदस्यांसाठी नेत्यांकडे मोठ्या प्रमाणात स्थानिक पुढारी समर्थकांना घेऊन भेटून आपल्याच संधी मिळावी यासाठी प्रयत्न करत असल्याने नेत्यांकडून कोणाला संधी देण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान सातारा जिल्हा परिषद व ११ पंचायत समितीतील स्विकृत सदस्य निवडीला जिल्हा बॅंकेतील अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राजकारणाची राजकीय किनार असणार आहे. जिल्हा बॅंकेच्या निवडीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपला डावलून घेतलेली भूमिका ही भाजपच्या नेत्यांना खटकली आहे. त्यामुळे यावेळी भाजपचे नेते पुन्हा आपली ताकद दाखवत जिल्हा परिषदेसह सर्व पंचायत समितीतही आपलेच स्वीकृत सदस्य जास्त होण्यासाठी प्रयत्न करणार की राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेचे नेतेही आपल्या कार्यकर्त्यांसाठी प्रयत्न करणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Makarand Patil-Shambhuraj Desai
Desai Vs Gore : दम कोणाचाय....? 11 पैकी 7 जागा आम्ही जिंकल्यात : शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार

सातारा जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल

भाजप : २७ जागा

राष्ट्रवादी काँग्रेस : २० जागा

शिवसेना (एकनाथ शिंदे) : १५ जागा

काँग्रेस : एक जागा

स्वाभिमानी शेतकरी संघटना : एक जागा

अपक्ष : एक जागा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.