Desai Vs Gore : दम कोणाचाय....? 11 पैकी 7 जागा आम्ही जिंकल्यात : शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार

Satara Dcc Bank Election 2026 : जयकुमार गोरे यांच्या आव्हानात्मक वक्तव्याला शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अकरापैकी सात जागा राष्ट्रवादी आणि शिवसेनेने जिंकल्याचा दाखला देत त्यांनी सवाल केला.
Jaykumar Gore-Shambhuraj Desai
Jaykumar Gore-Shambhuraj DesaiSarkarnama
Published on: 
Updated on: 

Satara, 21 November : ग्रामविकास मंत्री तथा भाजप नेते जयकुमार गोरे यांनी ‘दम होता तर जिल्हा बॅंकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवायची होती,’ अशी आव्हानाची भाषा केली होती. त्याला शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई कडक शब्दांत उत्तर दिले आहे. सगळ्याच गोष्टी बोलायच्या झाल्या तर आम्हालाही काही गोष्टी सांगता येतात. एवढीच दमाची भाषा असेल तर बॅंकेच्या १० जागा बिनविरोध झाल्या. उर्वरीत ११ जागांवर झालेल्या निवडणुकीत ७ जागा राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या निवडून आल्या. मग आता कोणाचा दम आहे? असा सवाल केला.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी आणि उपाध्यक्षपदी शिवसेनेचे दीपक चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ग्रामविकास मंत्री गोरे यांनी दम होता तर स्वबळावर निवडणूक लढवायची होती ना, असे म्हटले होते. त्याला शंभूराज देसाईंनी उत्तर दिले.

ते म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील घडामोडींमुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी आहे की नाही , हे मी कसं सांगू. त्याबाबत मला काहीही माहिती नाही. माझ्याबाबत मला विचाराल तर मी सांगू शकतो. पण, दुसऱ्यांच्या नाराजीबाबत मी कसं सांगू? पण, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे महायुतीचे झाल्याबद्दल आम्ही सर्वजण आनंदी आहोत. महायुतीमधील सर्व पक्ष आनंदात आहोत.

जिल्हा बॅंकेच्या ११ जागांवर निवडणूक झाली. त्यात ७ जागांवर मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आणि आमच्या शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. आम्ही कधीही दमाची भाषा केलेली नाही आणि करणारही नाही. मला यावर बोलायचं नव्हतं. पण तुम्ही प्रश्न विचारला आणि माझ्याही वाचनात कुठंतरी आलं म्हणून मी यावर बोलतोय, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

Jaykumar Gore-Shambhuraj Desai
Solapur Dcc Bank : मोहिते पाटलांनी रणशिंग फुंकले : कोल्हापूर, लातूरमध्ये शिट्टी जोरात वाजलीय; आता सोलापुरातही जोरात वाजवा...

ते म्हणाले, ‘मी त्यावर गप्प बसलो तर तुम्ही लोकच म्हणणार की, शंभूराज मूग गिळून गप्प म्हणजे काही तरी घोटाळा आहे. मला उघडपणे बोलायची सवय आहे. ११ जागांची निवडणूक झाली, त्यातील ७ जागा आम्ही निवडून आणलेल्या आहेत.

भाजपच्या स्वबळाच्या निवडणूक लढविण्यावर शंभूराज देसाई यांनी भाष्य केले. ते म्हणाले, महिला, मागासवर्गीय, ओबीसी आणि भटक्या जाती जमाती प्रवर्गातील उमेदवारांना मतदान कोण करतंय, तर ११ तालुक्यातील ठरावधारकच ना. बॅंकेच्या ११ जागांपैकी ७ ठिकाणी आम्ही निवडून आलो ना. मला आकडेवारी, गणितात अजूनही जायचं नाही. पण, जाणीवपूर्वक कोणी म्हणत असेल की तुमच्यात दम होता तर आमचीही चर्चेची तयारी आहे, असे चॅलेंज शंभूराज देसाई यांनी जयकुमार गोरेंना दिले.

Jaykumar Gore-Shambhuraj Desai
Pune News : पुण्यातून भाजपला धक्का! 6 वेळा आमदार आणि 2 वेळा खासदार असलेल्या कुटुंबातील व्यक्ती काँग्रेसमध्ये दाखल

अघोरी बाबा कुठं मिळतो?, हे त्यांना विचारतो...

अघोरी बाबा कुठे मिळतो?, हे मी मंत्री जयकुमार गोरेंना विचारतो. त्यांना अघोरी बाबाचा इलाज लागू पडला असेल तर मी त्यांच्याकडून माहिती घेतो, असा चिमटाही शंभूराज देसाईंनी गोरेंना काढला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.