Kolhapur NCP Meeting : का रे दुरावा! अजितदादांच्या सभेत नवे जिल्हाध्यक्ष शेजारी अन् ए.वाय कोपऱ्यात...

NCP Ajit Pawar Group Political News : ...पण त्यांची बेचैनी चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
Kolhapur NCP Meeting
Kolhapur NCP MeetingSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थित सोमवारी (ता.29) कागल तालुक्यातील मौजे सांगावं येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भव्य शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी या मेळाव्याला प्रचंड उपस्थिती लावली होती. मात्र याच व्यासपीठावर राष्ट्रवादीतील नेते एकदिलाने उपस्थित होते का? अशी चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना पदावरून काढल्यानंतर उपस्थित होते. पण त्यांची बेचैनी चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याविरोधात बंड फुंकल्यानंतर राष्ट्रवादीचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्याकडून कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्षपद काढून घेतल्याचे सांगण्यात येते. तर राष्ट्रवादीचे नवीन जिल्हाध्यक्ष म्हणून बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांच्याकडे पदभार देण्यात आला. पण मला विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ए.वाय पाटील यांच्याकडून सांगण्यात आले. तर नाराज ए. वाय पाटील यांना बढती देत त्यांना महाराष्ट्र राष्ट्रवादी (NCP) प्रदेश उपाध्यक्ष करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Kolhapur NCP Meeting
Advocate Couple Death : वकील आढाव दाम्पत्य हत्याकांड, न्यायालयीन कामकाज बंद; नगरमध्ये वातावरण तापले

पण राष्ट्रवादीच्या मौजे कसबा येथील मेळाव्याच्या व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नाराजीनाट्य दिसून आले. पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष असुर्लेकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उजव्याबाजूला तर पालकमंत्री हसन मुश्रीफ हे डाव्या बाजूला बसले होते. तर गेले अकरा वर्षांपासून जिल्हाध्यक्ष पद सांभाळलेले ए. वाय पाटील मात्र पवार यांच्यापासून 8 पदाधिकारी सोडून एका कोपऱ्यात बसले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी आमदारांनी ए. वाय पाटलांचे नाव टाळले

बिद्री कारखान्याच्या निवडणुकीनंतर माजी आमदार के. पी. पाटील आणि प्रदेशउपाध्यक्ष ए. वाय. पाटील हे पक्षाच्या मेळाव्यात प्रथमच एका व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी जुन्या आठवणीना उजाळा देताना मुश्रीफ यांच्या पाठीमागे स्वतः,युवराज (बापू) पाटील, भैया माने आणि फराकटे यांचे नाव घेत ए. वाय पाटील यांचे नाव घेणे टाळले. तर बिद्री कारखान्याचा विजयी उल्लेख करत चिमटे काढले.

(Edited By Deepak Kulkarni)

Kolhapur NCP Meeting
Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकरांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर शहराध्यक्ष घाटेंचं मोठं विधान, म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com