Patan News : पालकमंत्री देसाईंच्या जाचामुळेच पाटणला अधिकारी मिळेना ; उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाचा गंभीर आरोप...

Patan Revenue Administration : तहसीलदार पदासह पाच नायब तहसीलदार पदेही गेली अनेक महिने रिक्त.
Harshad Kadam, Uddhav Thackeray, Shamburaj Desai
Harshad Kadam, Uddhav Thackeray, Shamburaj DesaiSarkarnama
Published on
Updated on

Patan News : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्यात अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. प्रशासनाचा कणा असणाऱ्या तहसीलदार पदासह पाच नायब तहसीलदार पदेही गेली अनेक महिने रिक्त असल्याने तालुक्याचे महसूल प्रशासनाचे काम ठप्प झाले आहे. केवळ पालकमंत्री देसाई यांच्या जाचामुळे अधिकारी पाटण तालुका नको म्हणत आहेत, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या महायुती सरकारच्या गतिमान प्रशासनाचा पाटण तालुक्यात पुरता बोजवारा उडाला आहे. मंत्रिमंडळात आघाडीवर असलेल्या पालकमंत्री शंभूराज देसाई (Shamburaj Desai) यांच्यासारख्या मंत्र्यांच्या तालुक्यात अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात चार वर्षे कार्यकाळ पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Harshad Kadam, Uddhav Thackeray, Shamburaj Desai
Ashok Chavan : अशोकराव, काँग्रेसकडून तुम्हाला आणखी काय हवे होते ?

त्यामध्ये पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक आणि तहसीलदार यांच्या बदल्या झाल्या आहेत. या चार पदांपैकी पोलिस उपअधीक्षक हे पद सोडले, तर इतर तीन पदाला कारभारी मिळालेला नाही. तहसिलदार रमेश पाटील यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर कोणीही येण्यासाठी इच्छुक नाही. एक दोघांनी हिरवा कंदील दाखविला होता. मात्र, पुन्हा माघार घेतली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तहसीलदारांची बदली झाली आणि नवीन नेमणूक होईपर्यंत जिल्हा प्रशासन नायब तहसीलदारांना तात्पुरता पदभार देते. मात्र, काही महिन्यांपूर्वी कार्यरत असणारे एकमेव नायब तहसीलदार तुषार बोरकर यांनी बदली करून घेतली आहे. तहसील कार्यालयात चार व प्रांताधिकारी कार्यालयात एक अशी पाच पदे मंजूर असून, आज एकही नायब तहसीलदार तालुक्यात नाही.

यावरुन उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांनी पालकमंत्री देसाई यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. हर्षद कदम (Harshad Kadam) म्हणाले, विकास कामाच्या गप्पा मारणारे पालकमंत्री देसाई यांच्या तालुक्यात अधिकारीच नाहीत. अनेक जागा रिक्त आहेत. शासकिय दवाखान्यात डॉक्टर नाहीत. माोजणी खात्यात अधिकारी कमी आहेत. ते महाराष्ट्राचे व जिल्ह्याचे नेते होऊ पाहाताहेत ते होऊ शकत नाहीत.

मतदारससंघातच त्याचा ढिसाळ कारभार सुरु आहे. त्यांच्या जाचाला कंटाळून अधिकारी तालुक्यात येण्यास तयार नाहीत. जे चांगले अधिकारी होते ते बदली करुन बाहेर गेले आहेत. त्यामुळे त्यांनी पाटण मतदारसंघांच्या विकासाच्या मोठ्या गप्पा गोष्टी करु नयेत, असा सल्ला कदम यांनी दिला आहे.

(Edited by Amol Sutar)

Harshad Kadam, Uddhav Thackeray, Shamburaj Desai
Girish Mahajan News : एकनाथ खडसेंची घरवापसी ? गिरीश महाजन म्हणाले, 'त्यांची वरुन हॉटलाईन असेल तर...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com