

Kolhapur News: सोशल मीडियावर अक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून मोठा तणाव निर्माण झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी आज मोर्चा काढत कोल्हापूर बंदची हाक दिली होती. या मोर्चात सहभाग घेत शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. मात्र, या मोर्चादरम्यान दगडफेकीची घटना घडल्याने या मोर्चाला हिंसक वळण लागलं.
या घटनेनंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत जमावाला पांगवलं. सध्या कोल्हापूरमध्ये मोठा तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. याबरोबरच कोल्हापूरमधील इंटरनेट सेवा उद्यापर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर कोल्हापूरच्या जनतेला शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे आक्षेपार्ह मेसेज व्हायरल होऊ नये, यासाठी कोल्हापूरमधील मोबाईल इंटरनेट सेवा उद्यापर्यंत खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती तेथील पोलीस अधीक्षकांनी दिली.
मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या घटनेवर भाष्य केलं. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलिसांचं आहे. मी अधिकाऱ्यांशी स्वत:बोलत आहे. गृहमंत्री देखील अधिकाऱ्यांशी बोलत आहेत. कायदा कुणीही हातात घेण्याचं काम करू नये. यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल", असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
कोल्हापूरच्या घटनेवर फडणवीस काय म्हणाले?
कोल्हापूरमधील घडलेल्या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहविभागाला महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले, "कोल्हापूरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. कोल्हापूरमध्ये घडलेला प्रकार दुर्वेवी असून हा प्रकार कुणी घडवला हे शोधाव लागेल. कुणीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देऊ नये. दोषींना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई केली जाईल", असं फडणवीस म्हणाले.
Edited By - Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.