Ravindra Chavan on Satara loksabha : सातारा लोकसभेसाठी शिंदे - अजितदादा आग्रही, भाजपच्या चव्हाणांनी वाढवला सस्पेन्स; म्हणाले...

Satara Loksabha : बांधकाम मंत्री विविध विकासकामांची पहाणी, भूमिपूजन, उद्घाटन कार्यक्रमानिमित्त साताऱ्यात.
Ravindra Chavan
Ravindra ChavanSarkarnama
Published on
Updated on

Satara News : जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात विकासकामे बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरु आहेत. वेळेत निधी उपलब्ध होत नसल्याने या कामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे या कामांना आवश्यक निधी लवकरात लवकर उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. दरम्यान, सातारा लोकसभेच्या उमेदवारीचा निर्णय दिल्लीत पार्लमेंटरी बोर्ड तसेच राज्यातील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे तीन नेते घेतील. (Ravindra Chavan on Satara loksabha)

यावेळेस महाराष्ट्रातून 45 पेक्षा अधिक जागा महायुतीच्या माध्यमातून जिंकण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बांधकाम मंत्री आज विविध विकास कामांची पहाणी, भूमिपूजन, उद्घाटन कार्यक्रमानिमित्त साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, नुतन विश्रामगृह तसेच सैनिक स्कुलच्या नुतनीकरणाच्या कामाची पहाणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

Ravindra Chavan
Reservation : चंद्रपुरात धडकला ‘आरक्षण बचाव महामोर्चा’

यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, महेश शिंदे, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घ्यावा अशी येथील लोकप्रतिनिधींची मागणी होती, त्यानुसार हा माझा दौरा होता. या कामांना निधीबाबत काही अडचणी आहेत का, असतील तर त्या कशा पद्धतीने दूर करता येतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तातडीने निधी उपलब्ध करुन त्यांचा वेग वाढविण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.आज आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी जे पाठपुरावा केलेल्या कामांविषयी अडचणी आहेत. त्यांनी पाठपुरावा केलेला आहे, ठेकेदाराला काढून टाकल्यावर ते काम पूर्ण करण्यात अडचणी येतात. त्यामुळे त्या दृष्टीने प्रपोजल पाठविण्याची सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून या भागात मोठ्याप्रमाणात निधी दिला आहे.

सार्वजनिक बांधकामच्या कामांना निधी उपलब्ध केला आहे. पण लोकप्रतिनिधींनी प्रस्ताव दिलेल्या कामांना पुरेसा व वेळेत निधी उपलब्ध होत नाही. या सर्व कामांना लवकरात लवकर पुरेसा निधी उपलब्ध करु, असे त्यांनी सांगितले. रोप वेची कामे सुरु असून पर्यटनाच्या दृष्टीकोनातून ही कामे महत्वाची आहेत.

आता राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण व बांधकाम विभागाच्या संयुक्तविद्यमाने तब्बल ४० रोप वेची कामे पूर्ण केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. सातारा लोकसभेच्या उमेदवारीबाबत महायुतीत तिन्ही पक्ष आग्रही असून तिघांनीही उमेदवार देण्याची तयारी केली आहे. याबाबत मंत्री चव्हाण म्हणाले, महायुतीतील जागा वाटपाचे व उमेदवार निश्चितीचे सर्व निर्णय हे दिल्लीतील पार्लमेंटरी बोर्डाकडे आहेत.

तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे तीन नेते याबाबत समन्वयाने निर्णय घेतील. त्यामुळे मला याबाबत अधिक बोलता येणार नाही. पण महाराष्ट्रातून लोकसभेच्या ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी महायुती एकत्रितपणे प्रयत्न करणार आहे. त्यासाठी घटक पक्ष मिळून प्रभाव असलेल्या भागात एकत्रितपणे काम करतील.

मंत्र्यांच्या दौऱ्याकडे आमदारांची पाठ

बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा आज जिल्ह्यात दौरा होता. पण, त्यांच्या या दौऱ्यात महायुतीचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, कोरेगावचे महेश शिंदे हे दोनच आमदार पहायला मिळाले. बांधकाम विभागाची कामे सर्वच तालुक्यात सर्वच आमदारांच्या मतदारसंघात सुरु आहेत. पण, किमान महायुतीच्या आमदारांनीही तरी उपस्थित राहून आपल्या मतदारसंघातील निधी अभावी रखडलेल्या बांधकामच्या कामांबाबत मंत्री महोदयांना विचारणा करणे आवश्यक होते.

(Edited by Amol Sutar)

Ravindra Chavan
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency : रत्नागिरी-सिंधुदुर्गात किंगमेकर किरण सामंत यांचे तळ्यात- मळ्यात..!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com