

-पांडुरंग बर्गे
MLA Mahesh Shinde News : राज्याच्या महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदी सहभागी झाले असले तरी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा शेतकरी सभासदांच्या मालकीचा झाला पाहिजे, हीच आपली भूमिका काल होती, आजही आहे आणि उद्याही कायम राहिल, अशी माहिती आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव येथे पत्रकार परिषदेत दिली.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी Narendra Modi हे देशासाठी करत असलेल्या अभिमानास्पद कामगिरीला पाठींबा द्यायचा म्हणून आणि राज्याच्या विकासासाठी अजित पवार Ajit Pawar हे महविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी झाले असल्याने आम्ही त्यांचे स्वागत केले आणि करत राहू. त्यांना विरोध करायचा प्रश्न येत नाही.
नरेंद्र मोदी यांना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी उद्या काँग्रेसने जरी पाठींबा दिला तरी आम्ही त्यांचे स्वागतच करू. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जसे स्वराज्य स्थापन केले तशाच पद्धतीने स्वराज्य नरेंद्र मोदी पुन्हा आनत असतील तर आपण सर्वांनी त्यांना पाठिंबा द्यायलाच हवा. माझी "जरंडेश्वर"बाबतची भूमिका बदलण्याचा प्रश्नच येत नाही, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालय व निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हिच खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिला असल्यामुळे शिवसेनेचा आमचा गट वगेरे काही नाही. आम्हीच ओरिजनल शिवसेना आहोत. तेव्हा आम्ही दुसऱ्या कुठल्या तरी गटामध्ये वगेरे जाण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे साद आणि प्रतिसाद हा विषयच नाही.
श्री. शिंदे म्हणाले," राज्याच्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत कोणीही नाराज नाही, मुख्यमंत्री बदलाची तर सुतरामही शक्यता नाही, १६ आमदार अपात्र होणार वगेरे काहीही होणार नाही. काळजी करू नका. जे काही झाले आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वासात घेऊन झालेले आहे.
नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला जसा भरभरून विकास निधी दिला तशाच पद्धतीने आम्ही महाराष्ट्रातून त्यांना ४५ खासदार देणार आहोत. विरोधकांनी आता रस्त्यावर गोनपाट टाकून पोपट घेऊन निवांतपणे भविष्य सांगत बसावे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.