

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक अर्थात गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध करण्याच्या अनुषंगाने सुरु असलेल्या चर्चेवर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी मोठे विधान केलं आहे. गोकुळमध्ये 21 ऐवजी आता 25 संचालक होणार असल्याने ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली वरिष्ठ नेत्यांच्या प्रयत्नातून सुरू होत्या. मात्र महाडिक यांनी गोकुळची निवडणूक ही होणारच अशा शब्दात भूमिका मांडत त्यांनी या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे स्थगिती दिलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या आदेश राज्य सहकार्य निवडणूक प्राधिकरणाने मंगळवारी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघासह 432 सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाची मानली जाणारी कोल्हापूर जिल्हा बँक आणि गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीकडे सर्व नेत्यांसह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू असताना राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक हे निवडणुकीवर ठाम असल्याचे चित्र आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार महाडिक यांनी गोकुळची निवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी कोणतेही ठोस कारण नाही. त्यामुळे ही निवडणूक होणार आहे. महायुती म्हणून या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत. अशी स्पष्ट भूमिका खासदार धनंजय महाडिक यांनी मांडली. नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद आणि कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने आम्ही महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे गेलो त्याच पद्धतीने गोकुळच्या निवडणुकीत ही माहिती म्हणून जाण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत नाही. असेही खासदार महाडिक म्हणाले आहेत.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत रस्सीखेचवर खासदार महाडिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची जिल्हा परिषदेसाठी अध्यक्षपदाची भूमिका ही रास्तच आहे. पण त्याचबरोबर भाजपला देखील जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष पद हवा आहे. त्यामुळे पहिला अध्यक्ष पद राष्ट्रवादीला की भाजपला हा मोठा प्रश्न आहे. लवकरच महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठक होऊन हा प्रश्न मार्गी लागेल असेही खासदार महाडिक म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.