Gokul Election Result : गोकुळ'च्या निवडणुकीत पुन्हा ट्विस्ट, शौमिका महाडिक फेरमतमोजणीची मागणी, मतमोजणी केंद्रावर गोंधळ, सतेज पाटील पोहोचले!

Shoumika Mahadik Satej Patil : शौमिका महाडिक यांच्या फेरमतमोजणीची माहिती मिळताच आमदार सतेज पाटील हे दुचाकीवरून मतदानकेंद्रावर पोहोचले.
Satej Patil, Shoumika Mahadik
Satej Patil, Shoumika MahadikSarkarnama
Published on: 
Updated on: 

Satej Patil News : गोकुळ'च्या निवडणुकीत पुन्हा मोठा ट्विस्ट आला आहे. शौमिका महाडिक या पराभूत झाल्याची माहिती आहे. त्यांचा पाच ते सात मतांनी पराभव झाला आहे. मात्र, त्यांनी पुन्हा मतमोजणीची मागणी केली आहे. त्यामुळे मतदानकेंद्रावर गोंधळ झाला.

मतमोजणीवर समविचार आघाडीचे अभिजित तायशेटे व निवडणूक अधिकाऱ्यामध्ये खडाजंगी झाली. शौमिका महाडिक यांच्या फेरमतमोजणीची माहिती मिळताच आमदार सतेज पाटील हे दुचाकीवरून मतदानकेंद्रावर पोहोचले आहेत.

सतेज पाटील यांची समविचार आघाडी 14 जागांवर आघाडीवर आहे. आता केवल त्यांच्या विजयाची घोषणेची औपचारिकता बाकी असताना शौमिका महाडिक यांनी पुन्हा मतमोजणीची मागणी केल्याने एकच गोंधळ झाला. त्यांचा पराभव करणारे आघाडीचे अभिजित तायशेटे यांनी आक्रमक भूमिका घेतली.

या सर्व प्रकाराची माहिती सतेज पाटील यांना मिळताच ते देखील तातडीने मतमोजणी केंद्रावर दुचाकीवरून आले. दरम्यान, फेरमतमोजणीमध्ये देखील शौमिका महाडिक या पराभूत झाल्या आहेत.

गोकुळच्या निवडणुकीत महायुतीमधील दिग्गज नेत्यांना धक्का बसला आहे. अध्यक्ष महायुतीचाच असला पाहिले, अशी भूमिका घेणार अरुण डोंगळे यांन देखील पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता.

Satej Patil, Shoumika Mahadik
Gokul Politics : 'गोकुळ'मधील घडामोडीची कुणकुण लागली, दौरे रद्द करत मुश्रीफ, कोरे, कदमांनी विशेष विमानाने मुंबई गाठली!

अध्यक्षपदी शशिकांत चुयेकर?

निवडणुकीच्या काळात सतेज पाटील यांनी प्रचारात जाहीर केले होते की, आमची सत्ता आली गोकुळचे संस्थापक सदस्य आनंदराव पाटील चुयेकर यांचे पुत्र शशिकांत पाटील चुयेकर यांना अध्यक्ष करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे 'गोकुळ'चे अध्यक्ष शिशिकांत पाटील चुयेकर हे अध्यक्ष होणार असल्याची चर्चा आहे.

Satej Patil, Shoumika Mahadik
Gokul Election Results : गोकुळ निवडणुकीच्या निकालात मोठा ट्विस्ट, दोन माजी अध्यक्ष पिछेहाटीवर! मुश्रीफांची चिंता वाढली…

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com