Gokul Election 2026: 'महायुती'ला पराभवाचा धक्का देत 'गोकुळ'चं मैदान मारलं; 'बाजीगर' ठरलेल्या सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया समोर

Gokul News: गोकुळ दूध संघाच्या या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तापरिवर्तन पाहायला मिळालं. या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत.काँग्रेसच्या सतेज पाटलांच्या नेतृत्वातील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीनं 13-12 अशा फरकानं सत्ता मिळवली.
Satej Patil Wins Gokul Election 2026
Satej Patil Wins Gokul Election 2026Satej Patil Wins Gokul Election 2026
Published on: 
Updated on: 

Kolhapur News: गोकुळ दूध संघाच्या या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तापरिवर्तन पाहायला मिळालं. या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत.काँग्रेसच्या सतेज पाटलांच्या नेतृत्वातील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीनं 13-12 अशा फरकानं सत्ता मिळवली. तर दुसरीकडे महायुतीला 12 जागांवर समाधान मानावं लागलं. या निवडणुकीतील सतेज पाटलांनी गोकुळचा कंडका पाडल्यानंतर अखेर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी गोकुळच्या निकालानंतर सोमवारी(ता.19) माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले,गोकुळच्या निवडणुकीत कोल्हापुरातल्या दूध उत्पादकांनी बहुमत दिल्याबद्दल शेतकऱ्यांसह ठराव धारकांचे आभार मानतो.सर्वसामान्य लोकांना वाटत होते की, एकमुखी कारभार असावा म्हणूनच आम्हाला निवडून दिले असल्याचंही पाटील यांनी सांगितलं.

तसेच या गोकुळच्या निवडणुकीत जनरलमधली 98 मते बाद झाली आहेत,त्यातली 20 मतं आमच्या चिठ्ठी चिन्हावर मारली. नाहीतर आमचे अजून 7-8 उमेदवार निवडून आले असते. लोकांचा कौल आमच्याच राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी पॅनलच्या बाजूने होता. ही मतं बाद ठरली नसती, तर आमच्या 20 जागा निवडून आल्या असत्या,असा दावाही यावेळी सतेज पाटील यांनी केला.

सतेज पाटील म्हणाले, गोकुळच्या या निवडणुकीतील विजय-पराभव हा खेळाडू वृत्तीने स्वीकारायला हवा होता. दोन उमेदवारांनी पुन्हा मतमोजणीची मागणी केली. बाद मतं कन्फर्म केली होती,ही रिजेक्टेड होती. कायद्याला धरुन फेरमतमोजणी नव्हती, म्हणून अर्ज बाद केली. निवडणूक अधिकाऱ्यांनी नियमाप्रमाणे निर्णय घेतला,असंही ते म्हणाले.

Satej Patil Wins Gokul Election 2026
Gokul Results: फडणवीसांची रणनीती, 3 मंत्री, 2 खासदार अन् 10 आमदारांची फौज सोबतीला, तरी मुलाचा पराभव, 'गोकुळ' गमावलं; मुश्रीफांनी सांगितलं नेमकं कुठं चुकलं?

पुरोगामी कोल्हापुरात सत्तेतले लोक शपथेचे प्रकार करत होते,आता त्यांना चपराक बसली आहे. कालपर्यंत बोलल्यांना या निकालातून कोल्हापूर जिल्ह्यातील दुध उत्पादकांनी जोरदार उत्तर दिलं आहे. तसेच नियमाप्रमाणे तारीख लागेल आणि चेअरमन निवडला जाईल. मी आता टीकेत जाणार नाही. मला जाहीरनामा लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे,असं सतेज पाटील यांनी सांगितलं.

आमचं राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचं संचालक मंडळ गोकुळ आणि जिल्ह्यातील दुध उत्पादकांना न्याय देण्याची भूमिका बजावेल. महायुतीतला वाद त्यांच्यातला त्यांना माहिती. तुम्ही एकत्रच येणार होतात तर वाद कशाला केला हा माझा सवाल. सत्तेत असलो की सगळच आपलं असतं, असं काही लोक धरुन चालले होते असा हल्लाबोलही सतेज पाटील यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केला.

Satej Patil Wins Gokul Election 2026
Gokul Election Result : महायुतीला धक्क्यावर धक्के! मुश्रीफांच्या सुपुत्रासह दिग्गजांना पराभवाचा फटका; माजी आमदाराचाही पराभव; विनय कोरेंनाही धक्का

अरुण डोंगळें यांनी जे राजकारण केलं, त्याचा फटका त्यांना बसला असेल. आबाजी आमच्याकडे होते शेवटपर्यंत, तेही तिकडे गेले. मात्र, लोकांच्या ज्या काही भावना होत्या, त्या लोकांनी चिठ्ठीतून व्यक्त केल्या आहेत. ही निवडणूक साडेपाच लाख शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठरवून लढवली. येणाऱ्या सहा महिन्यांत सगळ्य़ा गोष्टींची अंमलबजावणी झालेली दिसेल,असा विश्वासही त्यांनी गोकुळमधील विजयानंतर बोलून दाखवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com