Kolhapur News, 19 Oct : गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूरसह राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, याचदरम्यान एका मतपेटीत सापडलेल्या चिठ्ठीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या चिठ्ठीतून एका मतदाराने ठरावधारकांना शपथा घालण्याच्या प्रकाराबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे.
'तुमच्या पोराबाळांना निवडून आणण्यासाठी आम्ही शपथ घ्यायची का?' असा सवाल या चिठ्ठीतून करण्यात आला आहे. निवडणुकीपूर्वी ठरावधारकांना पॅनेलच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी शपथा घालण्यात आल्याचा प्रकार चांगलाच चर्चेत आला होता. याच पार्श्वभूमीवर मतपेटीत टाकण्यात आलेल्या या चिठ्ठीची सध्या चर्चा रंगली आहे.
नेमकं प्रकरण काय?
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी मतदान होण्यापूर्वी ठरावधारकांना आपल्या पॅनेलच्या उमेदवारांनाच मतदान करण्यासाठी शपथा घालण्यात आल्याची चर्चा सुरू झाली होती. अनेक ठरावधारकांना देवाच्या शपथा देऊन ठरावीक पॅनेलच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आल्याचे समोर आले होते. या प्रकारावरून राजकीय वर्तुळात बराच वादही निर्माण झाला होता.
आता मतमोजणीदरम्यान एका मतपेटीत ही चिठ्ठी सापडल्याने शपथ घालण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. संबंधित मतदाराने 'तुमच्या पोराबाळांना निवडून आणण्यासाठी आम्ही शपथ घ्यायची का?' असं चिठ्ठीतून थेट सवाल उपस्थित करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, आतापर्यंत ८२५ मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. सर्वसाधारण गटाच्या पहिल्या फेरीत महायुतीचे २० उमेदवार आघाडीवर आहेत. तर सतेज पाटील गटाचे अभिजित तायशेटे आणि शशिकांत पाटील चुयेकर हे आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.