Mushrif-Patil Clash : मुश्रीफ साहेब मला खाणारेत का? की मी त्यांना? कट्टर विरोधकांचे गोकुळच्या बैठकीत मिश्किल टोमणे

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली असून, आता जागावाटपाचा तिढादेखील सुटल्यात जमा आहे.
Shivaji Patil-Hasan Mushrif
Shivaji Patil-Hasan MushrifSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमधील अंतर्गत आणि अंतिम बैठक आज पार पडत आहे. गुरुवार (ता. ८) हा अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय नेत्यांनी कोल्हापुरात तळ ठोकला आहे. अशा परिस्थितीत गेल्या सहा महिन्यांपासून अंतर्गत संघर्षाची राळ उठवणारे महायुतीमधील नेते या निमित्ताने एकत्र आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर एकमेकांमधील कटुता संपवण्यासाठी आजची बैठक महत्त्वाची समजली जात आहे.

दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि चंदगडचे नेते आमदार शिवाजीराव पाटील यांच्यामध्ये सुरू असलेला संघर्ष आज गोकुळ दूध संघाच्या निमित्ताने संपण्याची शक्यता आहे. महायुतीच्या दोन्ही बैठकांना उपस्थिती लावलेल्या आमदार शिवाजीराव पाटील यांनी आजच्या बैठकीला उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिवाजीराव पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा या बैठकीत मिश्किल टिप्पणींचा बार उडाला. काही दिवसांपूर्वी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजकारणाविषयी भाष्य करताना आमदार शिवाजीराव पाटील यांनी, “मुश्रीफांचे राजकारण म्हणजे अजगरासारखे आहे,” असे विधान केले होते.

Shivaji Patil-Hasan Mushrif
Gokul Election : 'सतेज पाटलांना नैराश्य म्हणूनच महायुतीवर...'. धनंजय महाडिकांचा घणाघात

त्याच शिवाजीराव पाटील यांनी आज गोकुळच्या महायुतीच्या अंतिम बैठकीसाठी प्रवेश केला. बैठकीच्या खोलीत जात असतानाच त्यांनी केलेली महत्त्वाची टिप्पणी जिल्हाभर चर्चेचा विषय ठरली.

भाजपचे राहुल चिकोडे हे आमदार शिवाजीराव पाटील यांना घेऊन येत असताना त्यांनी पदाधिकाऱ्यांना, “बैठक कुठे सुरू आहे?” असे विचारले. मात्र, ज्या खोलीपाशी शिवाजीराव पाटील उभे होते, त्या खोलीमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Shivaji Patil-Hasan Mushrif
Gokul election : गोकुळच्या पत्रकावरून महायुतीत ठिणगी; शौमिका महाडिकांचा हसन मुश्रीफांना टोला, महादेव जानकरांनाही सुनावलं

पदाधिकाऱ्यांचे हे बोलणे ऐकताच आमदार शिवाजीराव पाटील यांनी मिश्किल टिप्पणी करत, “मुश्रीफ साहेब मला खाणार आहेत का? की मी त्यांना खाणार आहे?” असे विधान करून खळबळ उडवून दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com