Rajyasabha Election : ...तर ठाकरे गटाच्या आमदारांचा तिथेच कार्यक्रम होणार; उद्योग मंत्री सामंतांनी दिला इशारा

Shivsena Wheep : मनात आलं म्हणजे विधिमंडळाचे अधिवेशन घेता येत नाही. त्यासाठी प्रोसेस असते.
Uday Samant
Uday SamantSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : राज्यसभेची निवडणूक लागली, तर आमच्या बाजूनं प्रतोद भरत गोगावले यांचाच व्हीप लागू होईल. राज्यसभेच्या निवडणुकीत दाखवून मतदान करायचे असते, तसे झाले नाही तर त्यांचा तिथेच कार्यक्रम होणार, अशा इशारा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नाव न घेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदारांना दिला. (Industry Minister Uday Samant's warning to Thackeray Group MLAs)

शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) अधिवेशन उद्यापासून (ता. 16 फेब्रुवारी) दोन दिवस कोल्हापुरात होणार आहे. त्याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी हा इशारा दिला. ते म्हणाले, राज्यसभेची निवडणूक लागली तर प्रतोद गोगावले यांचाच व्हीप शिवसेनेच्या आमदारांना लागू होणार आहे. त्या निवडणुकीत विरोधात मतदान केले तर तिथेच कार्यक्रम होणार, असा इशाराच सामंत यांनी ठाकरे गटाच्या आमदारांना दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uday Samant
Loksabha Election 2024 : शरद पवार ॲक्शन मोडवर; शिरूर, बारामती अन्‌ पुणे लोकसभेसाठी आखला विशेष प्लॅन

दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर आमचाच (शिवसेना) दावा असणार आहे. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

सामंत म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मुद्यावर उदय सामंत म्हणाले, मनात आलं म्हणजे विधिमंडळाचे अधिवेशन घेता येत नाही. त्यासाठी प्रोसेस असते. मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी लागते. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर येत्या 20 फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन होणार आहे.

जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आम्ही नाराज नाही. कारण त्यांनी एक आंदोलन उभा केले आहे. माझी विनंती आहे की, जरांगे पाटील यांनी तब्येतीची काळजी घेऊन आंदोलन करावं. मराठा समाजाला टिकणारे आंदोलन देणार, हे आधीच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. नारायण राणे यांनी जे जरांगे पाटील यांच्याबद्दल बोलले आहेत, ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे, असेही उद्योग मंत्र्यांनी स्पष्ट केले.

Uday Samant
Shivsena Convention : शिवसेनेत आता शिवसैनिकांच्या धर्तीवर ‘शिवदूत’; कोल्हापूरच्या अधिवेशनात होणार घोषणा

सामंत म्हणाले, राजू शेट्टी आंदोलन करत आहेत, म्हणजे निवडणूक जवळ आली आहे. राजू शेट्टी यांना मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं असेल तर ते 100 टक्के पूर्ण करतील. एकनाथ शिंदे हे दिलेलं आश्वासन पूर्ण करणारे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पाळले जाईल. त्याबाबत मला राजू शेट्टी यांच्यासोबत बोलायला सांगितलं, तर मी बोलेन.

Edited By : Vijay Dudhale

Uday Samant
Atpadi Politics : निधी अवघा दोन कोटींचा; श्रेयवाद रंगला सत्ताधाऱ्यांच्या दोन गटांत!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com